Er Rational musings #372
काही वर्षांपूर्वी पर्यंत बाँलिवूड वर राज्य केलं ते पंजाबी नायक व साऊथ इंडियन नायिकांनी! म्हणजे, हिरो म्हणलं की पंजाबी रांगडा व हिराँईन म्हणलं की दाक्षिणात्य व उत्तम नृत्यांगना. नाही म्हणायला इतरांनीही गाजवली चित्रपटसृष्टी, पण प्राबल्य, पगडा म्हणाल तर...
मध्यंतरी, मूछमूंढे हिरोज ची लाईन लागली, मिशी अक्षरश: हद्दपार झाली हिंदी सिनेमां मधून. मिशी राखणारा हिरो विरळाच.
मग, मूछमूंढ्या हिरोज ची लाईन लागली. काही, धर्मेंद्र सारखे 'ही मँन', जाँय मुखर्जी व शम्मी शशी कपूर सारखे ताड उंच तर काही विश्वजीत सारखे दीड फूट! काही प्रदीपकुमार सारखे ठोकळे तर काही संजीवकुमार सारखे सच्चे अभिनेते.
या कपूर, कुमारां नी राज्य केलं, पण यांची संस्थानं खालसा केली, सद्दी संपवली ती खान लोकांनी, खऱ्याखुऱ्या मुछमुंढ्यांनी. आधीही काही खान होते, जसे फिरोज खान वगैरे, पण ह्या सलमान शाहरूख व आमीर खान्स ची बातच काही और आहे!
आता सध्या मात्र पिळदार शरीरयष्टी, मँस्कूलिन पणा व दाढी चे वाढलेले खुंट (स्टबल!) यांची चलती आहे! त्याचबरोबर, उत्तम डान्स करता येणंच येणं, ही आवश्यकता. किंवा, एकदमच लेटेस्ट बाजीराव मिशी (सिंघम नव्हे, बाजीराव मस्तानी मधून साभार!!)
हिराँईन्स मध्ये पण स्थित्यंतर झाले. मोठ्ठा खोटा केसांचा विग घालण्यापासून ते सर्रास बिकीनी घालण्या पर्यंत.
आणि, पूर्वी एक साइड अँक्ट्रेस व्हँप च काम करायची. उदाहरणार्थ हेलन, अरूणा इराणी, हेलन, बिंदू, वगैरे. नाँर्मल गाण्यांमध्ये हिराँईन्स व एक्स्पोजींग डान्स सिक्वेन्स मध्ये ह्या वारांगना.
आता आपल्या हिराँईन्स च एक्स्पोज करतात, व लीड रोल व आणखी बरंच काही ही करतात!
वरील सर्व निरीक्षणांबाहेर आहेत ते फक्त आणि फक्त,
पहिला सूपर स्टार, राजेश खन्ना व अर्थातच, बिग बी...
---
मिलिंद काळे, 10th February 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment