Er Rational musings #363
लोकविज्ञान संघटना मुलुंडला आणली ती प्रा. सोमण व गुरूनाथ पेडणेकर (आमचे लाडके जीपी) यांन्नी. साधारणपणे शह्याऐशी सत्याऐशी ते नव्वद एक्याण्णव पर्यंत संघटनेबरोबर आँफ आणि आँन, काम केलं. खरेखूरे कार्यकर्ते म्हणजे मित्रमंडळी, आमोद कारखानीस, अद्वैत पेडणेकर, अनिल वगळ, प्रदीप देशपांडे, विनोद गावडे, प्रफुल्ल पांडव, इ इ.
भानामती, करणी, अंगात येणं, हवेतून अंगारे बिंगारे काढणं, नारळातून धूर बीर काढणं, असली कितीतरी फसवाफसवी चालायची, त्यासंबंधांत लोक जागृती चं काम आम्ही करत असू. मग शाळांमधून ह्या सगळ्या चमत्कारांचे (हातचलाख्यांचे) प्रात्यक्षिक द्यायचे; ह्या सगळ्यांमधलं विज्ञान समजवायचं. सोसायट्यांत, गच्चीवर, पण हे उद्योग करायचे. रस्त्यावर पोस्टर्स घेवून असल्या भोंदूगिरी विरूद्ध सत्य मांडायचं, हे असले प्रकार बरेच केले. पूढे आम्ही खगोलशास्त्रा संबंधी कार्यशाळा आयोजित केल्या. स्वस्त व परवडतील असे टेलिस्कोप आणले, विकले, भेट दिले. नेहरू सायन्स सेंटर मध्ये विद्यार्थ्यांकरता एक प्रोग्रँम अँरेंज केला, ज्याची सू्त्रं आनंद टिळक ने सुरेख समर्थपणे सांभाळली. चांगला ग्रूप जमला होता.
पूढे पूढे, सगळे पांगले. बहुतेकांची लग्ने झाली. काहींनी मुलुंड सोडले. प्रायाँरिटीज थोड्या बदलल्या. आपापल्या उद्योगाला लागले.
आमची मैत्री मात्र टिकून आहे.
भन्नाट दिवस होते ते...
A MEMOIR
---
मिलिंद काळे, 5th February 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment