Er Rational musings #400
सिगारेट स्मोकींग इज इंज्यूरियस टू हेल्थ - वैधानिक इशारा.
मैं जिन्दगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुंएँ में उडाता चला गया
बरबादीयों का सोग़ मनाना फिजूल था बरबादीयों का जश्न मनाता चला गया
जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया
जो खो गया मैं उस को भुलाता चला गया
गम और खुशी में फर्क ना महसूस हो जहाँ
मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया
गीतकार : साहिर लुधियानवी,
गायक : मोहम्मद रफी,
संगीतकार : जयदेव,
चित्रपट : हम दोनो (१९६१)
हे गाणं ऐकताच आठवते ती ब्ल्यू बर्ड. सिगारेट होती, किंमत पाच (होय, पाच, 5 पैसे!!) पैसे. आमचा श्रीगणेशा झाला तो ब्ल्यू बर्ड ने, दीपमंदीर च्या गल्लीत, भर पावसात. एका छत्रीत दोघेच आम्ही. ही माझी प्रथम शिलगावलेली धूम्रकांडी. वर्ष मात्र गुप्त ठेवतो, एक्स्पोज नाही करत मी आता.
Blue Bird, Panama, Capstan, Four square, Charminar Gold, Chesterfield, Red & White, Avanti, Classic Mild, Gold Flake, Wills Royal, Chancellor, More, Marlboro, Dunhill, State Express 555, Benson & Hedges, and above @ll "Wills Navy Cut" etc.
सगळ्या झाल्या, खूपच आवडल्या, पण चारमिनार गोल्ड, व विल्स या जरा जास्त. विलायती ब्रँड म्हणजे मित्राच्या वडिलांच्या सिगारेट पाकिटातून त्याने ढापलेल्या.
नंतर माझा खरा खुरा सिगारेट ब्रँड बनला तो विल्स नेव्ही कट; कायमचा. सखी. मेड फाँर इच आँदर...सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत.
व्वा, क्या बात हैं; ओठांचा चंबू करून रिंग्ज काढायच्या. एका झुरक्यात पंचवीस तीस तरी बारक्या बारक्या रिंग्ज काढायचो; किंवा एकाच मोठ्ठ्या रिंग मधून एक छोटी रिंग फेकायची! विलोभनीय.
हे देव आनंद जे म्हणतोय ते तर एकदमच 'मेड फाँर इच आँदर', असेच आहे.
मैं जिन्दगी का साथ निभाता चला गया...
# देव आनंद
Actually अस आहे की
# जो निकल गया मैं उस को बुलाता चला गया
जवळ जवळ 24 वर्ष झाली या लाडक्या गोष्टीला सोडून. Like others. मात्र अजूनही ती आवडते.
Can't help. Accepted.
पण आता दूरून...
---
मिलिंद काळे, 26th February 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment