Er Rational musings #399
~ आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असतय. जानेवारी ते डिसेंबर का नसतय? कधी पासून हे असं झालं? एल टी ए घ्यायचा जानेवारी ते डिसेंबर मध्ये पण टँक्स बेनेफीट साठी इन्व्हेस्टमेंट मार्च पर्यंत अलाऊड! शैक्षणिक वर्ष आणखीनच वेगळं. टोटल कन्फ्यूजन.
~ हिंदी चित्रपटसृष्टीच्या पारितोषिक वितरण सोहोळ्यात (म्हणजे स्क्रीन, फिल्म फेअर अवार्ड वगैरे) सूत्रधार, तसेच पारितोषिक विजेते, मंचावरून इंग्लिश मधेच का बोलतात बहूतेक जण? हिंदीत का नसतय? टोटल कन्फ्यूजन.
~ एखाद्या न्यूज चँनेल ने डिस्कशन चालू असताना वा असाही, ब्रेक घेतला जाहीरातींसाठी की असे असावे की चालू कार्यक्रमात इशारा करतात बहुतेक कँमेऱ्या आडून, की रायव्हल चँनेलने कमर्शियल ब्रेक घेतलाय, मग हे अँकर लगोलग इथेही ब्रेक घेतात. वेल, असा माझा कयास आहे. टोटल कन्फ्यूजन.
काय की बुवा...
---
मिलिंद काळे, 25th February 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment