Saturday, February 20, 2016

Er Rational musings #393

Er Rational musings #393



झुणका (घट्ट पिठलं), चूलीवरची भाकर (भाकरी नव्हे), हाताची बुक्की मारून तोडलेला कांदा (कापलेला नव्हे) आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. मातीने सारवलेली जमीन, मांडा (मांडी नव्हे) घालून कोरड्याने खाण्याची लज्जत और आहे. वर पेल्यातून पाणी. मायेचा ओलवा.

बाईक सवारी, दोनशे सव्वा दोनशे किमी. मग मस्तपैकी ताणून दिली, कसला पंखा अन् कसलं काय, गरजच नाहीये (अर्थात पंखा पण नाहीये!)

परतीचा प्रवास. सुंदरसा डांबरी रस्ता. तुरळक रहदारी. दूतर्फा झाडे, मध्येच गावं, गावातले स्पीड ब्रेकर्स, 1 लिटर उसाचा रस, मध्येच बाजूला पठारं तर मोकळं शेत, काही धाबेवजा टपऱ्या. मोकळा वारा, केअर फ्री.

पण मुलुंड आल्याचं वासावरूनच कळत! चांगल्या अर्थी हं. हीच आहे ना, जन्म - कर्म भूमी. आपलंस, माझं मुलुंड. किंग आँफ सबर्बज म्हणतात, पण दँट इज अँब्सोल्यूटली इम्मटेरियल!



आता छानसे चार पाच कटिंग मारावे एखाद दोन नाक्यांवर व मगच घरी जावे, हे योग्य.



दोन चार महिन्यांतून एकदा तरी आऊटबाऊंड...

---

मिलिंद काळे, 20th February 2016

No comments:

Post a Comment