Tuesday, February 23, 2016

Er Rational musings #398

Er Rational musings #398



Live life King-size!



काय मस्त वाटत ना ऐकायला?



राजासारखा रहा, राजासारखा जग, इत्यादि; म्हणजे ऐषआरामात रहा व जगा. मज्जाच मज्जा. एन्जाँय! राजा म्हणजे नुसता दरबारात बसलेला, नर्तकींच्या नृत्यात मग्नदंग, गुंग! हातात मदीराचषक, पाय लांब सोडून वगैरे वगैरे अशी एकंदरीत समजूत आहे. कायम निवांत, काळजीविना, खाणे पिणे नाचबाजा, दिमतीला सगळे हजर अशीही. म्हणजे, निदान हेच चित्र डोळ्यांसमोर तरळते ना? तसेच, सगळच ग्रँड स्केलमध्ये, रूबाबात, व थाटामाटात दिमाखात, अशीही.



परंतू आपण बाकीच्या महत्वाच्या गोष्टींकडे एवढे कानाडोळा करतो की बास्स.



आपण सोयिस्कररित्या विसरतो ती राजाची किमया, कर्तव्ये,व कर्तबगारी. विसरतो ती राजाची हुशारी, हजरजबाबीपण, व हरहुन्नरीवृत्ती. राजाचे दातृत्व, दानशूरपणा, व दयावानता. विसरतो ती राजाची सहिष्णुता, साहसीवृत्ति, व सजगता.



साईज म्हणजे फक्त भव्य दिव्य नेत्रदिपक व जनरली मोठ्ठ, असच नाही. साईज म्हणजे सूक्ष्म, सूक्ष्मतर, व सूक्ष्मतम निरीक्षण, निदान, व न्याय्य निवाडा.



सोप्पं आहे का? कर्मकठीण आहे. कोणा येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे.



खरेच, चला तर मग: लेट अस आँल 'लीव्ह लाईफ किंग साईज'...

---

मिलिंद काळे, 23rd February 2016

No comments:

Post a Comment