Er Rational musings #380
लोकं खरच काय काय करतात, कौतुक वाटतं.
म्हणजे, निव्वळ पैसे कमावण्या व्यतिरिक्त, बर का. (याच काही लोकांन्ना उदरनिर्वाहापुरते कमावलेलेही पुरते. यांना आपण अतरंगी किंवा चमत्कारिक किंवा व्हिम्झीकल असेच ओळखतो).
या मालिकेतले पह्यले मोती!
ट्रेकर्स
ह्या जमातीची जातकुळीच वेगळी आहे. ओव्हरआँल निसर्ग, दऱ्या, डोंगर, झाडं झुडपं, इत्यादि गोष्टींचा यांना अक्षरश: चसका लागलेला असतो. एखाद्या ड्रग अँडिक्टला जर ड्रग्ज पासून वंचित ठेवले तसेच यांचे होते, जर हे लोक्स डोंगरांत नाही जावून आले काही दिवस तर. पाण्याबाहेर काढलेला मासाच जणू, फडफडणारा. यांचे नुसते हातच नाही तर पायच शिवशिवत असतात भटकायला.
गिऱ्यारोहण, प्रस्तरारोहण, पदभ्रमण, एकंदरीत भटकंती, म्हणजे यांचा स्थायीभावच, जीव का प्राण!
हे...नीले गगन के तले
धरती का प्यार पले
हे...नीले गगन के तले
धरती का प्यार पले
ऐसेही जग में आती हैं सुबहे
ऐसे ही शाम ढले
हे...नीले गगन के तले
शबनम के मोती, फूलों पे बिखरे
दोनों की आस फले, हे नीले...
बलखाती बेलें, मस्ती में खेलें
पेड़ों से मिलके गले, हे नीले...
नदियाँ का पानी दरिया से मिलके
सागर की और चले,
हे...नीले गगन के तले
धरती का प्यार पले
अतरंगी लोक्स...
---
मिलिंद काळे, 13th February 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment