Er Rational musings #368
~ कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही असं म्हणतात;
पण गायीच्या वराने कावळा जगतोच असही नाही ना?
~ अंथरूण पाहून हातपाय पसरा असं म्हणतात;
पण हातपाय पाहून अंथरूण वाढवायला काय हरकत आहे?
~ तूम्ही आलात तर तुमच्या बरोबर व नाही आलात तर तुम्हाला सोडून आम्ही पूढे जातच राहू असं म्हणतात;
पण त्याचबरोबरीने तुम्ही आडवे आलात तर तुम्हाला कापून व उभे आलात तर तुम्हाला चिरून आम्ही पूढे जातच राहू असं म्हणायला काय हरकत आहे?
काळानुसार बदलणं, चांगले बदल आत्मसात करणं, बदलांच भान ठेवणं, बदलांचे तारतम्य बाळगणं, आणि बदलांना सामोरे जाणं; केवळ हेच स्थैर्याचे लक्षण आहे.
चेंज इज द ओन्ली काँन्स्टंट इन लाईफ...
---
मिलिंद काळे, 8th February 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment