Thursday, February 11, 2016

Er Rational musings #378

Er Rational musings #378



गळ्यांत गळे घालणं, कवेत घेणं, गळ्यात पडणं, बाहूंत घेणं, मिठीत घेणं!



प्रेम व्यक्त करायला फिजीकल काँटँक्ट हवाच ना? हवाच हवा. पंचमहाभूतांना शांत करून, त्यांचे आशिर्वाद घेवूनच सर्व गोष्टी मार्गी लागतात. मग मैत्री त्याला अपवाद कशी असेल?



इट्स लाईक दोघांनी बसून दारू पिण्यासारखं आहे.



सुरवातीला आपण चियर्स!, असं का करतो, माहीत आहे? पंच महा भूतांना प्रेमाने नमन करूनच सेशन सुरू करायचं असतं, करतो ना?



दारू चा भरलेला ग्लास दिसतोय (डोळे), छानसा वास येतोय (नाक), चव तर घ्यायचीच आहे (तोंड), ग्लासाला स्पर्श तर करायचाच आहे (हात) व ग्लासेस एकमेकांशी हलकेच भिडवून, चीअर्स म्हणून, साजेसा खळ्ळ आवाज करूनच (कान) ओठांना ग्लास लावायचा असतो, पहिला घोट घ्यायचा असतो!



आणि, या फिजीकल काँटँक्टला कसलीच मर्यादा नसते. जसजशी दारू चढत जाते, जसजशी मैत्री गाढ होत जाते, जसजसे सेशन लांबत जाते जसजशी मैत्री जूनी होत जाते, तसतसे आपण, मधून मधून वरचेवर, मैत्रीच्या नशेत गाढ बुडत जातो. व ग्लासाला ग्लास भिडवून 'हग' करतो!



विशिंग आँल माय डियर फ्रेंड्स, अ व्हेरी हँपीली लव्हींगली, इंटरनँशनल 'हग' डे!!



आता, हा व्हर्च्यूअल काँटँक्ट म्हणजेच फिजीकल 'हग'...

---

मिलिंद काळे, 12th February 2016

No comments:

Post a Comment