Er Rational musings #355
गेली 40 वर्षे तरी महाराष्ट्र टाईम्स वाचतोय. पत्र नव्हे मित्र. एक मराठी व एक इंग्रजी वर्तमानपत्र असं घरचं (प्रथा, सवय) असल्याने, सुरवातीला अनेक वर्षे इंडियन एक्सप्रेस पण घरी यायचा, मटा च्या जोडीने. नोकरीला लागल्यापासून अँडिशनली बाहेरून विकत घेऊन टाईम्स आँफ इंडिया, व जवळजवळ 1985 ते 1996 पर्यंत दर शनिवारचा मिड डे व आफ्टरनून!(शनिवारची जंबो क्राँसवर्ड्स सोडवण्याची सवय, चसका लागला) मग टाईम्स आँफ इंडियाचे क्राँसवर्ड्स सुध्दा. मेंदूला खाद्य.
गेली पंधराएक वर्षांपासून दोन बदल झालेत. इंडियन एक्सप्रेस ची जागा डीएनए ने घेतली आहे. वार्ताहर पण डेली अँड झालाय. (वार्ताहर मध्ये दररोज शेवटच्या पानावर जंबो मराठी शब्द कोडं असायचं, म्हणून. ते बाबांना आवडायचं, त्यांचा छान वेळ जायचा. बाकी बातम्या यथातथाच असायच्या सुरूवातीच्या काही वर्षांत) टाईम्स आँफ इंडिया आवर्जून घेणं बंद झाल आता, एक्सेप्ट सन्डे. मुंबई टाईम्स ही पुरवणी उत्कृष्ट. पण रविवारची लोकसत्ता हवीच. (इतर दिवशी नको!) रविवार म्हटलं की मटा, लोकसत्ता, वार्ताहर, डीएनए व टाईम्स आँफ इंडिया; नुसतम पेपर वाचन.
कितीही न्यूज चँनल्स आली, तरी वर्तमानपत्रं हवीच. सकाळी, कधी एकदा पेपर येतात व कधी संपवतो वाचून, असे अजूनही होतं. म्हणतात ना, ओल्ड हँबीट्स डाय हार्ड, असच काहीसं.
मुलांचं मात्र बरं आहे. पेपर ला हात लावतील, पण सिनेमा नाट्य आफ्टर अवर्स स्टोरीज ना वाहिलेल्या पुरवण्यांना. बाकीच्या बातम्या, गोष्टींसाठी मोबाईल आहेच. हे अँप, ते अँप. न्यूज अपडेशन आँन द गो.
स्ट्रीमिंग लाईव्ह, 24x7xतीनशे सहासष्ठ...
---
मिलिंद काळे, 2nd February 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment