Er Rational musings #348
पोस्टमनsss
सर्वपरिचीत हाक, काळाच्या ओघात दूरावलीये. मेल बाँक्सेस तळमजल्याला. प्रत्येकाच्या नावानिशी. त्यामूळे प्रत्यक्ष संबंध दोनच वेळा; स्पीडपोस्ट असेल तेव्हा व 'दिवाळी'च्या पूढे पाठी!
पूर्वी तार (telegram) आली की भितीयुक्त कुतूहल वाटायचं. मनी आँर्डर द्वारा हाँस्टेल मधल्या मुलांना पैसे 'पोस्ट' केले जायचे. राखी पोर्णिमेच्या आसपास राख्या यायच्या. मकर संक्रांतिच्या आसपास तिळगूळ हलवा यायचा. दिवाळीच्या आसपास साध्या पोस्ट कार्डावरील शूभेच्छा (साधं सिंपल पणती बिणती काढलेलं) यायच्या. बोर्डाच्या परीक्षांचा निकाल पण यायचा व नवीन नोकरीचं अपाँईंटमेंट लेटर पण यायचं.
लेकिन अभी कूरीयर, नेटबँकिंग, और वर्क फ्राँम होम का जमाना हैं।
परंतू आता पोस्टल डिपार्टमेंटनेही कात टाकलीये.
प्रोफेशनँलिझ्म, प्रगत तंत्रज्ञान, व पंक्च्युअँलिटी मध्ये थोsडे हे स्लो असतील पण खूप मागे नाहीयेत हे बरिक खरं नक्कीच आहे!
आणिक याउप्पर जबाबदारीने मला नमूद करायला काहीच संकोच नाही वाटत की बेजबाबदारपणा, कामचुकारपणा, इनएफिशियन्सी, व भ्रष्टाचार (!), या अशा सर्व डिपार्टमेंट्स मध्ये (सरकारी) पोस्टल डिपार्टमेंटचा शेवटून पहिला दूसरा तिसरा चौथा नंबर असेल!!
ऊन, थंडी, पाऊस, वारा, डिस्टन्स, कशाकशाची पर्वा न करता तंगडतोड करत, आपल्या दारी येणाऱ्या पोस्टमन ला गुळ-पाणी (!!), साँरी, चहा पाणी (अँटलीस्ट) विचारण्याची तसदी घेऊया का?
What a great yeoman's service...
---
मिलिंद काळे, 30th January 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment