Tuesday, January 12, 2016

Er Rational musings #317

Er Rational musings #317



ससा तो ससा की कापूस जसा

त्याने कासवाशी पैज लाविली

वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ

ही शर्यत रे अपुली



चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले

नि कासवाने अंग हलविले

ससा जाई पुढे नि झाडामागे दडे

ते कासवाने हळू पाहियले

वाटेत थांबले ना, कोणाशी बोलले ना

चालले लुटूलुटू पाही ससा



हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे

हे पाहुनिया ससा हरखला

खाई गार चारा, घे फांदीचा निवारा

तो हळूहळू तेथे पेंगुळला

मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे

झाडाच्या सावलीत झोपे ससा



झाली सांज वेळ तो गेला किती काळ

नि शहारली गवताची पाती

ससा झाला जागा, तो उगा करी त्रागा

नि धाव घेई डोंगराच्या माथी

कासवा तेथे पाही, ओशाळा मनी होई

निजला तो संपला, सांगे ससा



गीतकार : शांताराम नांदगावकर ,

गायक : उषा मंगेशकर,

संगीतकार : अरुण पौडवाल



लाघवी बोल व लयबध्द चाल व लोभस शब्द व लडिवाळ संगीतसाज.



आपण हे ऐकत ऐकतच मोठे झालोय ना?



अर्थ अनेक, जसे



~ थांबला तो संपला

~ गर्वाचे घर खाली

~ जो जीता वो ही सिकंदर

~ दूसऱ्याला कमी लेखू नका



And

Slow and steady wins the race...

---

मिलिंद काळे, 10th January 2016

No comments:

Post a Comment