Er Rational musings 339
मऱ्हाठी, अर्र, मराठी भाषा समृध्द आहे. वळवावी तशी 'ही' वळते 'असेही' म्हणतात. आपली बोली, आपला बाणा.
द्वयार्थी शब्द असंख्य. शिवाय आपण कसं 'बघतो', कसं 'घेतो', कसं 'ऐकतो' कसं ही कसंसस 'बोलतो'ना तेही महत्वाचे.
आता जरा मजेशीरपणा; शब्द, वाकप्रचार, बोली भाषेतला वापर, वगैरे. वानगीदाखल. नो हार्ड फिलींग्ज!
'घाल' आणि 'वाढ' यात फरक आहे.
जेवायला बसलो की भाजी/चटणी/कोशिंबीर/चटणी/पोळी/भात इ 'घाला' असं नाही म्हणायचं, तर भाजी/चटणी/कोशिंबीर/चटणी/पोळी/भात इ 'वाढा' अस म्हणायचं! आमटी/डाळ इ सुध्दा 'वाढायची' असते, 'ओतायची' नसते. चहा 'ओता', चालेल.
'जातो' आणि 'येतो' यात फरक आहे.
चला बाय, मी 'जातो', असे न म्हणता, चला बाय, मी 'येतो', असे म्हणावे. (माणूस जातोय, बाहेर चाललाय, तो परत येण्यासाठीच ना?)
'मिळणे' आणि 'भेटणे' यात फरक आहे.
बस 'मिळेल' असे म्हणावे, बस 'भेटेल' असे नाही. तिकीटे 'मिळतील' असे म्हणावे, तिकीटे 'भेटतील' असे नाही.
काही 'सकृतदर्शनी' टिपीकल 'ब्राह्मणी' बोली आणि ब्राह्मणेतर (!) शब्दच्छल.
~ पत्यांतील राजा व्हर्सेस बादशहा तसेच गोटू व्हर्सेस गुलाम
~ काकू आणि काकी
~ तिकूडनं आणि तिकडून
~ बिरड्या आणि डाळिंबी
~ मासे आणि मच्छी
~ पोळी आणि चपाती (पण नाँर्मल बर का. कारण पूरण 'पोळी'च असते व गुळाची ही 'पोळी'च असते, पूरण 'चपाती' व गुळाची 'चपाती' असं काही नसतं.)
मी मराठी, 'माय' मराठी...
---
मिलिंद काळे, 25th January 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment