Friday, January 15, 2016

Er Rational musings #325

Er Rational musings #325



खऱ्या खवय्यांसाठी फूड फेस्टिवल, मग ते कोणाचेही असो, म्हणजे एक पर्वणीच.

निमित्त आजचे ठाण्यात भरलेले सीकेपी फूड फेस्टिवल.



नाममात्र का होईना, प्रवेश शुल्क ठेवले की क्राऊड जेन्यूईन येतो.



अनेक पदार्थ; अर्थातच सामिष मेजवानी साठीच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू उर्फ सी के पी (काही जण चोरून काढलेली पोरं (!) असाही लाँग फाँर्म करतात, आता काय बोलणार?!) जास्त प्रसिद्ध आहेत. यांच्याकडील शाकाहारी स्पेश्यालिटीज पण एकसे एक असतात, बरं का.



मासे, मटण व चिकन चे एकापेक्षा एक सरस, ताजे, गरमा गरम, चविष्ट मिळण्याचे खूप स्टाँल्स इथे आहेत. जोडीला सूप, भाकरी, पँटीस, सोलकढी, व आईसक्रीम चे सुध्दा अनेक स्टाँल्स. अंडर वन रूफ.



दिवसभर चालू असणारे (१ वा २ तासच बंद असणारे) हे फेस्टिवल परवा पर्यंत चालू आहे.

अवश्य भेट द्या. आवर्जून खादाडखाऊंना बरोबर घेऊन जा.



आजच जाऊन आलो. मनसोक्त आडवा हात मारून आलो. मासे व मटण हापसले.



खाण्यासाठी जन्म आपूला...

---

मिलिंद काळे, 14th January 2016

No comments:

Post a Comment