Er Rational musings #310
सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे
आज लाभले सखी, सौख्य जे मला हवे
अबोल प्रीत बहरली, कळी हळूच उमलली वेदना सुखावली, हासली तुझ्यासवे
एकटा तरी स्मृती, तुझ्याच या सभोवती
बोललो कसे किती, शब्द शब्द आठवे
गीतकार : मधुसूदन कालेलकर,
गायक : महेंद्र कपूर,
संगीतकार : एन. दत्ता,
चित्रपट : अपराध (१९६९)
अ क्लासिक गीत. सुंदर पिक्चरायझेशन.
चक्क, रमेश देव, सीमा व इंद्राणी मुखर्जी!
या गीतात पियानोचा केलेला वापर केवळ अप्रतिम. रमेश देव हे गाणे म्हणतोय व स्पूल्सवाल्या टेप रेकाँर्डर ने रेकाँर्ड करतोय. हा एक भाग. दूसऱ्या वेळी हेच गाणं बारशाच्या वेळी ऐकवलं जातं, सुरेख.
तिघांच्या चेहेऱ्यावरील क्लोज अपस् असो किंवा रमेशची न दिसणारी, पण पियानोवर फिरणारी बोटे असो वा त्याचा हलकेच एकट्याचाच पाच सहा स्टेप्स चा डान्स असो वा स्वत:भोवतीची गिरकी - एकदा क्लाँकवाईज, एकदा अँटी क्लाँकवाईज (!) असो किंवा इंद्राणीने हळूच सीमाचा घेतलेला पापा असो, व्वा, क्या बात हैं.
बाळावर स्थिरावणारा कँमेरा, मधून मधून, रमेशने रेकाँर्ड केलेल्या भूतकाळात घेवून जातो. सीमाची काळी साडी वर्सेस इंद्राणीची काळी साडी, काँट्रास्ट, कथेबरहुकूम!
हळूवार प्रीतीची दुर्मिळ झलक...
---
मिलिंद काळे, 6th January 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment