Thursday, January 14, 2016

Er Rational musings #322

Er Rational musings #322



मुंबापूरी मधली मराठी माणसे फारच इंटरेस्टिंग होती व आहेत. मराठी पाँकेटस् होती व आहेत ती प्रामुख्याने गिरगाव, गिरणगाव (लालबाग परळ चिंचपोकळी करीरोड अभ्यूदय नगर काळा चौकी सहकार नगर), हिंदू काँलनी, दादर शिवाजी पार्क कँडल रोड माटुंगा रोड माहिम, मच्छीमार काँलनी, विलेपार्ले, गोरेगाव, बोरीवली, आणि ईस्टर्न सबर्बज मधे फक्त मुलुंड!



प्रत्येक भागातल्या मराठी लोक्स च्या आवडी निवडी, रिती रिवाज चाली, खाद्य संस्कृती, आर्थिक परिस्थिति, पोशाख, बोली, स्वभाव, प्रकृती, नोकरी व्यवसाय, वागणे बोलणे, इव्हन दिसणे वगैरे इतके भिन्न होते आहेत की काही विचारू नका.



गिरगावातला मराठी टक्का कमी होतोय झालाय हे वास्तव आहे. उरलेले लोक्स संस्कृति जपून आहेत. गिरणगाव तसे बघितले तर लोअर परेल व अप्पर वरली (वरळी!) ह्या स्थित्यंतराचे साक्षीदार कळत नकळत भागीदार आहे. दादर, शिवाजी पार्क मात्र टिकून आहे. येथील लोक्स कालानुसार सधनता मेंटेन करून आहेत. पार्ले खरेखूरे सच्चे सांस्कृतिक! गोरेगाव बोरीवली मध्य, उच्च मध्यमवर्गीय लोक्स नी व्यापलेलं, जून्या नव्याचं उत्तम मिश्रण आहे.



फेमस मिटिंग जाँईंटस् म्हणजे गिरगावातील फडके गणपती मंदिर, गिरगावातील चाळी व चाळींतल्या गल्या नाके, शिवाजी पार्क परिसर, पार्ल्याचे पणशीकर जंक्शन, गोरेगावातील वाड्या, बोरीवलीचा वझीरा नाका एरीया, ते आपल्या मुलुंडचे संभाजी मैदान, देशमुख उद्यान, गोडबोले चहा दूकान, बंटी चहा हाँटेल, आझाद चहा नाका, नीलम नगर नाका चहा टपरी, गव्हाणपाडा बस स्टाँप चहा स्टाँल, त्याचबरोबर पूर्वेची शिवसेना शाखा ते महाराष्ट्र सेवा संघ ते मुलुंड जिमखाना इ इ.



ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या शहरांतील मराठी वस्ती अशीच लक्षणीय व तशीच वैविध्यपूर्ण.



ठाणे हे अनेक बाबतीत पूण्याशी साधर्म्य राखून आहे. डोंबीवली बद्दल काय बोलावं? डोंबीवली फास्ट व डोंबीवली रिटर्न, पांढरपेशे सुशिक्षित. कल्याणचे मराठी जन जरा हटकेच, मी म्हणजे कोणीतरी, जरा गर्विष्ठ शिष्ठत्वा कडे झुकलेले की काय इतबर शंका यावी! अंबरनाथ बदलापूर पसरलेले व सिटी तून मायग्रेट झालेल्यांचे म्हणता येईल.



मुलुंडची ओळख उपनगरांचा राजा विथ वेल प्लँन्ड नगर रचना अशीच करता येईल, येते.

थोर इतिहासकार सेतू माधवराव पगडी ते दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे, उद्योगपती भाऊसाहेब केळकर ते अभिनेत्री निशिगंधा वाड, संगीत संयोजक अशोक हांडे ते कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, लेखक भा ल महाबळ ते संस्कृत पं प्रभाकर भातखंडे, चित्रकार यशवंत शिरवाडकर ते क्रिकेटपटूअजिंक्य रहाणे, लेखिका डाँ विजया वाड ते कवी अरूण म्हात्रे, महाराष्ट्र सेवा संघाचे प्रणेते सु ल गद्रे ते महाराष्ट्र सेवा संघाचे प्रथम आजन्म सभासद, १९४६ साली मुलुंडला येऊन स्थाईक झालेले माझे आजोबा कै वासुदेव रामचंद्र काळे वगैरे.



अगदी लेखक दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई ते xxx xx.



You know what I mean...

---

मिलिंद काळे, 14th January 2016

No comments:

Post a Comment