Tuesday, January 12, 2016

Er Rational musings #319

Er Rational musings #319



कानातलं, गळ्यातलं हे समस्त महिलांचे परवलीचे प्रचलित शब्द आहेत. आणि हे मोस्टली रस्त्यावर वा प्रदर्शनात वा दूकानातून विकत घेताना.

डूल/हार न म्हणता सगळ्या बायका असंच म्हणतात.

पायातलं/हातातलं/नाकातलं/दंडातलं/बोटातलं/केसातलं/कंबरेतलं (हुश्श) वगैरेना स्पेसिफिक नावानेच संबोधतात.

बरं, रस्त्यावर कानातलं गळ्यातलं स्वस्त मिळतं, प्रचंड व्हरायटी असते. नखशिखांत 'मँचिंग' च्या आवडीमुळे प्रत्येकीकडे शेकडोंन्नी कानातली गळ्यातली असावीत!



आणि बायकांच्या छान स्वच्छ सुंदर रहाण्याला, लोक्स 'नटणं' असं का म्हणतात? हातातली पर्स, पिशवी,बँग ते छत्री ते जवळचा मोबाईल ते पायातल्या चपला, सँडल्स इ ची रंगसंगती मिळती जूळती, उठून दिसणारी असावी असंच ह्यांना वाटलं व तश्याच त्या 'सजल्या' तर गैर काय?



लाल, हिरवे, पिवळे इ काय पुरूषांनी वापरायचे रंग आहेत का! कोणी पुरूष स्लिव्हलेस लाल रंगाचा शर्ट व पिवळी पँट घालून जर आँफिसला गेला तर? आहे का समाजाची मानसिकता? अती पूर्व काळी मातृसत्ताक पध्दत होती असे संशोधनाने सिध्द होतय. पण हा पेहेरावातला फरक कधी पासून व का पडला, कुठे सुरू झाला, कसा जगभर पसरला, कोणी पाडला, ह्यावर लिमिटेड, बहुतेक शून्य माहिती अँव्हेलेबल आहे.



काहीही असो, जागतिक बाजारपेठ मात्र 'स्त्री प्रधान' आहे हे निर्विवाद...

---

मिलिंद काळे, 12th January 2016

No comments:

Post a Comment