Wednesday, January 27, 2016

Er Rational musings #344

Er Rational musings #344



प्रेम करावं मनापासून. दिलसे. मोरपिशी. तारूण्य सुलभ. उत्कट. वेडं, वेड लावणारं, वेड्यासारखं. .



मात्र व्यक्त वेळीच केलेल बरं! म्हणजे जर ती म्हणाली की व्हाय आर यू वेस्टींग यूवर टाईम व माय टाईम अल्सो, तर नकाराला सामोरं जावून नंतर एकतर्फी असलं तरी काही हरकत नाही. ती दूरून आवडतच राहील ना? मग वन वे स्ट्रीट...



दोन्ही बाजूनी होकार असेल तर मात्र आणखीनच सांभाळून. वर्ड आँफ काँशन: ट्रँडिशनल प्रेमी युगुले, उदाहरणार्थ

रोमियो ज्यूलियट, हीर रांझा, लैला मजनू, सलीम अनारकली, शिरीन फरहाद इ सारखं "नको"!! नकोच नको. कारण,



कारण या कुठल्याही जोडीचे लग्न झाले नाही, त्यांनी एकत्रित संसार केला नाही! त्यांनी आयुष्य एकत्रित नाही घालवल, घालवूच शकले नाहीत ते; सो सँड. म्हणायला ठीक आहे हो.



अर्थातच, शेवटी लग्न म्हणजे सर्वस्व का? व्हेदर द एन्ड जस्टिफाईज द मिन्स?



हे असले फेक्यूलर (!) पुरवोगामी (!) प्रश्न आहेतच...

---

मिलिंद काळे, 27th January 2016

No comments:

Post a Comment