Er Rational musings #324
दारू सोडली आणि माझं आयुष्यच बदललं. आँ? होय, होय, बरोबर वाचताय सगळेजणं. दारू 'सोडल्यामुळे' लाईफ बदललं. लोकांची दारू 'धरल्यामुळे' लाईफ बदलतं, असा समज आहे, नाँर्मली; पण माझे कायमच भलतच काहीतरी; ऐकावे ते नवलच!!
पण मित्रांनो, खरच सांगतो. माझी अत्यंत लाडकी गोष्ट म्हणजे दारू. प्रचंड, मनापासून प्रेम केलं (अजूनही करतो!) मी तिच्यावर, व त्यामुळेच 'वाया' नाही गेलो. व्हिस्की, रम, व्होडका, जीन, बियर ह्या सगळ्यांवर माझे समसमान प्रेम. आलटून पालटून मूड, माहोल व मेहफि़ल बघून काय प्यायचे हे ठरवायचे. आणि विविध मेक् पाहीजेत. एका ब्रँडवर अडकून नाही रहायचे.
ब्लेंडर्स प्राइड असो वा राँयल स्टँग, स्मरनाँफ असो वा अल्काझार, फोस्टर्स असो वा किंग फिशर वा कुठलीही जीन असो, (पण रम म्हणजे फक्त ओल्ड माँक!) सगळा स्टाँक असायचा, अजूनही घरी आहे, व बाहेरही समसमान प्रेमाने आवडीने आलटून पालटून सगळ्याची चव एन्जाँय करायची, मनापासून.
अचानकपणे डोक्यात आलं, बंद करूया, कायमची. एवढी जीवाभावाची साथी मी ठरवून १ जानेवारी २०१५ पासून सोडून दिली. चक्क. Just like that.
विदाऊट गिव्हींग एनी पूर्वकल्पना, पूर्वसूचना, वन शाँट कट!
तरी बरेच हितचिंतक म्हणायचे
# करून सरून भागलास आणि देवपूजेला लागलास!
# एवढे अती कशाला करायचं?
# डाँक्टर ने सांगीतलं असेल.
# फक्त एक किंवा दोनच घे रे!
# नो हार्ड! बियर तरी घे!
# निदान मुंबई बाहेर तरी?!
# ओकेजनली तरी घे!
# तत्सम.....
मी सांगायचो, अरे बाबांनो असलं काहीही नाही; फक्त व फक्त मला वाटलं म्हणून.
नंतरही व आत्ताही मी पूर्वीच्याच उत्साहाने पार्ट्या अँरेंज करतो, दारू पाजतो, नुसता बसतो व नंतर स्वत:च्या गाडीने मित्रांना घरीही सोडतो. पूर्वीप्रमाणेच सर्व, एक्सेप्ट माझे स्वत:चे पीणे.
पण, पण काय सांगू मित्रांनो, त्या दिवसापासून टेपर्ड वे ने माझी व्यावसायिक कामे कमी झाली. एक गोष्ट सरळ होईना. साला कामे कमी झालीयेत हे खरेच आहे. बऱ्याच चर्वीचर्वण व अँनालेसिस व कारणे शोध मोहीमेनंतर मला सकृतदर्शनी अँडव्हर्स कारण काही सापडत नाहीये.
अेक्सेप्ट माझ्या लाडक्या सखीला अचानकपणे अन-सेरेमोनियसली धुडकारण्याचा परिणाम व तीने उगवलेला सूड. खरच सांगतो, अक्षरश: गांx मारली गेलीये!!
I am, therefore, resolving hereby that, I'll wait till 31st March 2016 for the situation to change for the better (end of the Financial Year).
Thereafter, there would be no other option left to me, except to turn back to my very old but faithful aide for life.
Cheers...
---
मिलिंद काळे, 15th January 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment