Er Rational musings #335
लहानपणी दररोज शुभं करोती म्हणायची शिकवण होती, आज्जीची. आमच्या बरोबर ती सुध्दा म्हणायची.
दिवेलागण झाली की स्टार्ट करायचो.
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा
शत्रुबुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोsस्तुते
दिव्या दिव्या दिपोत्कार कानी कुंडले मोतीहार
दिव्याला पाहून नमस्कार।
ही उजेडाला उद्देशून केलेली वंदना.
मग, इतर काही श्लोक
भीम रूपी महा रुद्रा वज्र हनुमान मारूती
वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना...
मग रात्री रामरक्षा,
असस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य...
सकाळी उठल्यावर
कराग्रे वसते लक्ष्मी: कर मध्ये सरस्वती,
करमुले तू गोविंद: प्रभाते करदर्शनम्...
All are self explanatory.
श्रध्दा (!), पण बरे वाटायचे!
मोठ्यांचे ऐकायचेच, त्यातून आज्जी अण्णा म्हणजे प्रश्नच नाही.
आणि सगळ्यांमध्ये मला आवडायचे ते, झोपताना म्हटलेला श्लोक!
बोललेल्याचा जप होतो,
चाललेल्याच्या प्रदक्षिणा होतात,
जेवलेल्याचा नैवेद्य होतो,
झोपलेल्याचा तूला साष्टांग दंडवत.
आस्तिक नास्तिक काळभैरव.
जबरदस्त प्रोफाऊंडली मिनिंगफूल...
---
मिलिंद काळे, 21st January 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment