Thursday, January 28, 2016

Er Rational musings #345

Er Rational musings #345



माझी माध्यमिक शाळा वामनराव मुरांजन!



वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालय. पुरंदरे. व मुलुंड विद्यामंदिर. मराठी माध्यम. (उतरत्या क्रमानं!!)

सेंट पायस. फ्रेंड्स. व सँमसन. इंग्रजी माध्यम. (उतरत्या क्रमानं!!)

आणि म्युनिसिपालटीच्या 2-3.

आणि छोट्या मोठ्या चिटूकल्या चंदनबाग, दयानंद सरस्वती, ज्ञानसरिता, मोतीपछान वगैरे.

उण्यापुऱ्या 12, 13, 15 शाळा. एकोणीसशे ऐशीच्या दरम्यान, मुलुंड मध्ये.



त्यातही क्वालिटेटीव्ह क्रमवारी करायची तर माझी वामनराव सर्वश्रेष्ठ!! अर्थातच, काय प्रश्न आहे काय?!!



ट्यूशन क्लासेस म्हणलं तर आमची मजल (दरमजल) सिनकर सर किंवा भडंग सर. नंतर ठाण्याचं कर्नावट, काँमर्स साठी वा दादरचं अगरवाल सायन्स साठी!



काँलेज म्हणजे फक्त मुलुंड काँलेज आँफ काँमर्स.



बस्स, संपला विषय!



याच शाळा काँलेजांनी, मुलुंडने त्याकाळी समकालीन अनेक दिग्गज, निरनिराळ्या क्षेत्रातले, घडवले.



काही नामोनिर्देश, केवळ उदाहरणार्थ, प्रातिनिधिक.



~ नामवंत कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हा माझा बँचमेट, मित्र.

~ माझा मित्र रणजीपटू रवी ठाकर.

~ सीए व सीएस, दोन्ही परीक्षांत भारतात पहिला क्रमांक पटकावलेला माझा मित्र, ज्येष्ठ अर्थतज्ञ डाँ अभिजीत फडणीस.

~ काँमनवेल्थ गेम्स मध्ये भारतातर्फे दूहेरी स्पर्धा खेळलेला बँडमिंटनपटू रवी कुंटे.

~ ग्लँक्सो सारख्या मल्टीनँशनल कंपनीचा कंपनी सेक्रेटरी, माझा मित्र अजय नाडकर्णी.

~ विश्वसुंदरी युक्ता मूखी इथलीच.

~ रिअल इस्टेट क्षेत्रात क्रांती घडवणारा निर्मल ग्रूपचा धर्मेश जैन, माझा पूर्वाश्रमीचा लायन्स क्लबचा टेबल टेनीस पार्टनर, इथलाच.



आणि आत्ताचा



अजिंक्य रहाणे पण इथलाच. हार्ड कोअर, बाँर्न अँड बाँट अप मुलुंड!



आत्ताच्या घडीला जवळपास, पन्नासच्या आसपास शाळा मुलुंडमध्ये आहेत. एसएससी, आयसीएससी, सीबीएससी बोर्डांच्या. चमत्कारिक नावाच्या पण, जसे बाँगी (बिल्लाबाँग), होरी (होरायझन) इत्यादि. याव्यतिरिक्त शेकडोंन्नी ट्यूशन क्लासेस आहेत. बारा पंधरा काँलेजेस् आहेत.



परंतू, छापखाने झाले बहू असे वाटते कधीकधी.



कारण, युनीक, एकमेवाद्वितीय, लक्षणीय, चमकदार, नेत्रदिपक अशी कामगिरी कोणी कोणत्या क्षेत्रात केल्याचं, गेल्या काही वर्षांत ऐकिवात नाही.



अरे, कुठे नेवून ठेवलय मुलुंड माझं...

---

मिलिंद काळे, 28th January 2016

No comments:

Post a Comment