Wednesday, January 20, 2016

Er Rational musings #334

Er Rational musings #334



हाँटेल जेव्हढं कळकट मळकट, तेव्हढी उत्कृष्ट चव असते, येथे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांना; असा माझा स्वानुभव आहे; अशी माझी ठाम समजूत आहे.



कळायला, कमवायला लागल्या पासून मी नि:संकोच पणे, अशा हाँटेल्स मध्ये जातो.

आवर्जून जातो. नजर शोधतच असते. त्या त्या वेळेनुसार व भूक तहाने नुसार बिनदिक्कत खातो पीतो.



वडा पाव, पाव पँटीस, समोसा, भजी, उसळ मिसळ पाव, भूर्जी पाव, आँमलेट, हाफ फ्राय, बाँईल्ड एग पाव, खिमा, मटण चिकन, बैदा मसाला, रोट्या, भात सूरवा वा डाळ मारून, व्हेज नाँन व्हेज थाळी, डाल राईस, बिर्याणी, तवा पुलाव, चायनीज फ्राईड राईस, ते अगदी शिरा पोहे उपमा, इ इ सारख्याच प्रेमाने खातो. बाकडं असो वा खूर्ची. खाण्याची वेळ नसेल, भूक नसेल, इच्छा नसेल तर चहा मात्र हा हवाच, काहीच नाही तर.



पूऱ्या आयुष्यात शेकडो हाँटेले, टपऱ्या पालथ्या घातल्या असतील, पादक्रांत केल्या असतील.



खाण्यावरच बोलायचं झालं तर मला थंड शीत पेये, आईसक्रीम, दही, तूप, मीठ, लिंबू अजिबातच नको असते. गोड पक्वान्न म्हणजे श्रीखंड बासूंदी गुलाबजाम गुळाची पोळी पुरणाची पोळी जिलेबी इ वर्ज्य, त्याज्य! परंतू समोर येईल ते, पानात पडेल ते, एकदा खायचे, संपवायचे अशी 'चांगली' शिकवण आज्जीने लावलीये. त्यानुसार सगळे वरचे गोड पदार्थ खातो पण आवडीने नाही. असो.



सांगायचा मुद्दा असा, की हे विश्वची माझे घर प्रमाणे वागलो तर या 'विश्व' कर्मा चे शुभाशीर्वाद पाठराखण केल्या शिवाय रहात नाहीत.



थर्ड रेटेड ते फर्स्ट ग्रेड हाँटेल सर्वत्र सारख्याच ईझ मधे वावरा; इक्वली आवडीने, मिटक्या मारत, कौतुक करत, व आभार मानोमनी मानत मानत खा.



अन्न हे पूर्णब्रम्ह.



वदनी कवळ घेता नम घ्या श्रीहरीचे |

सहज हवन होते नाम घेता फुकाचे |

जीवन करि जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रम्ह। उदारभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ||



गोविंद...

---

मिलिंद काळे, 20th January 2016

No comments:

Post a Comment