Saturday, January 9, 2016

Er Rational musings #315

Er Rational musings #315



एक अकेला इस शहर में, रात में और दोपहर में

आब-ओ-दाना ढूँढता है, आशियाना ढूँढता हैं



दिन खाली खाली बर्तन है, और रात है जैसे अंधा कुवां

इन सूनी अंधेरी आखों में, आँसू की जगह आता है धुंआ

जीने की वजह तो कोई नहीं, मरने का बहाना ढूँढता है



इन उम्र से लंबी सडकों को, मंजिल पे पहुचते देखा नहीं

बस दौड़ती, फिरती रहती है, हम ने तो ठहरते देखा नहीं

इस अजनबी से शहर में, जाना पहचाना ढूँढता है



गीतकार : गुलज़ार,

गायक : भूपेंद्र,

संगीतकार : जयदेव,

चित्रपट : घरोंदा (१९७७)



व्हाँट अ साँग! धीर गंभीर घोगरा घन स्वर!

सिनेमाच्या अडीच तासांच अंतर साताठ मिनिटांत कापणारं व कँनव्हास उलगडणारं काव्य!

मुंबई, माया नगरी. मोहमयी 'माया'वी नगरी.

तुमच्या माझ्या सारखा साधा सरळ मध्यमवर्गीय तरूण.

आँफीस मधलीच साधी सरळ मध्यमवर्गीय तरूणी.

घरच्या जबाबदाऱ्या, मित्रांनी एकत्र छोट्याश्या जागेत रहाणं, लग्न तर करायचय मग रहायला वेगळं स्वत:च्या मालकीचे घर (घरटं) नको?

त्याकरताचा हा शोध, हा प्रवास. हा प्लाँट.

अतिशय मन लावून काम केलय यात अमोल पालेकर (सूदीप) व झरीना वहाबने (छाया).

अव्याहत अविरत वहाणारी मुंबई. रस्ते व लोकल ट्रेन्स. चौपाटी दर्शन. आशयघन सेंटर थीम चे गीत. बेहतरीन. कहानी में ट्विस्ट भी हैं

सदतीस अडतीस वर्षांपूर्वी च्या परिस्थितित व आत्ताच्या यंग कपल्स च्या घरासंबंधी च्या स्वप्नात, केलेल्या धडपडीत, काहीच फरक नाहीये ना?



माझ्या लाडक्या मुंबईत माझे स्वतःचे, नव्हे, आम्हा दोघांचे, छोटेसे का होईना, पण स्वप्नवत स्वर्गवत घरकुल...

---

मिलिंद काळे, 9th January 2016

No comments:

Post a Comment