Er Rational musings #333
नटसम्राट काल रात्री बघितला. (10.35 चा शो!)
पंचवीस तीस वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. दत्ता भट व डाँ श्रीराम लागूं सारख्या दिग्गजांनी कुसूमाग्रजांच्या ह्या एपिक महा नाटकाला प्रचंड उंच उंचीवर नेवून ठेवले होते. तद्नंतरच्या प्रत्येक नटसम्राटाने, अगदी आत्ता आत्ता पर्यंत आपापल्या परीने डिफरंट डायमेन्शन दिलेय.
असलं अजरामर महा नाटक चित्रपट रूपांत साजरं करायचे म्हणजे डिफरंट डायमेन्शनच, महा आव्हानच जणू. पेललय, पेलवलय, बऱ्यापैकी. परंतु, पण तितकंच (पिरियड)!
सिनेमँटिक लिबर्टीची म्हणे आजकाल गरज असते. पटकथेमध्ये, संवादांमध्ये काळास्वरूप, काला'बाद'नुसार बदल करावे लागतात. रंगमंच व पांढरा पडदा, दोन्ही सापेक्ष माध्यमे आहेत. पार्श्वसंगीत, स्वगतं, कट सीन्स, एडिटिंग, कला, वेषभूषा, सिनेमँटोग्राफी, रंगसंगती मिक्सींग, क्लोज अप शाँट्स व कथेच वर्तमान भूतकाळात सोप्प येणं जाणं अशा गोष्टींमूळे सिनेमा उजवा ठरू शकतो, नाही, सिनेमाने वेगळीच उंची गाठता येऊ शकते, नव्हे, गाठायलाच पाहिजे.
साँरी टू से, विथ आँल सेड अँड डन, "नटसम्राट, असा नट होणे नाही", अपेक्षीत परिणामकारक होत नाही, ही वस्तुस्थिति आहे, दूर्दैवी.
दारूच्या सीन ने सुरू झालेला, दारूच्या सीन ने मध्यांतर करणारा, उत्तरार्धात फास्ट पकड घ्यायचा प्रयत्न करतो. मध्येच लक्ष्यवेधी, मध्येच लक्षवेधी. मध्येच उत्कंठा वर्धक, मध्येच - अरे ज 'रा' अजून - अशी चूटपूट, मध्येच थोडं अवांतर मध्येच थोsड सवांतर समांतर!
{सिग्नेचर व्हिस्की ची बाटली बँकग्राऊंडला चूकून दिसते. सत्तर ऐशी मध्ये डाँज गाडी (लग्नाच्या वरातीतील) व जावयांची जीप गाडी बरोब्बर दाखवलीये, पण सिग्नेचर? (तेव्हा नव्हतीच!)}
नाना व विक्रम गोखलेंकडून असा अभिनय हवाच, इट्स अ मिनिमम रिक्वायरमेंट. तांत्रिक बाबी हल्ली नेटक्या, देखणीय असतातच, दँट इज अ मिनिमम रिक्वायरमेंट. इतर अंगं सुध्दा ओके, दँटस् अ मिनिमम रिक्वायरमेंट. अँड नाऊ अडेज दोज आर तुलनेने क्वाईट सहज शक्य. सर्वांत महत्वाचं म्हणजे दिग्दर्शन. जमलय बऱ्यापैकी, तरीही रूखरूख राहते(च). खूप वाव होता असं वाटतं राहतं. .
शिवधनुष्यच हे खरतर.
पण, काहीतरी कोठेतरी चुकलय, नक्कीच...
---
मिलिंद काळे, 20th January 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment