Friday, January 29, 2016

Er Rational musings #347

Er Rational musings #347



काही लोक्सचं श्वान प्रेम व माऊ प्रेम बघून गलबलायला होतं.



प्राणी पाळीव कधीपासून सार्वत्रिक, सार्वजनिक झाले, माहीत नाही. परंतु, पुरातत्व प्राचीन कालापासून कुत्रा वगैरे, आपल्या देवांसोबत, राजे दरबारी असावेतच, कारण याचा उल्लेख सापडतो. आम आदमी कधीपासून 'ह्यात' 'घूसला', हा संशोधनाचा विषय असावा, असो.



कुत्रा,मनीमाऊ पाळायची ठरली, की मग सुरवातापासून दोन तट पडतात घरोघरी. हा प्राणी घरचाच होणार. त्याची शू शी कोण काढणार. तूम्ही सगळे बघणार आहात का? मलाच बघाव करावं लागणार. असे अनेक! अर्थातच, जर कुटुंबप्रमूखी च जर पाळायच्या बाजूने, मुला टोरांच्या बाजूने असेल तर फूल्लस्टाँप, चर्चेला विराम ☺!



मग होतं 'गाढवी' प्रेम! आमचा प्रिन्स ना पेढे सुध्दा खातो. त्याला फक्त मटण चाँप्स लागतात. आमची माऊ ना माझ्या च बिछान्यात झोपते. दूसरं कोणी पलंगावर बसलेलं पण तिला आवडत नाही वगैरे वगैरे. 😛!



असंच एकदा आम्ही काही मित्र, आमच्या एका श्वान प्रेमी मित्राकडे गेलो होतो. सहाजिकच त्या श्वानामालकाची कौतूक बडबड सुरू झाली. मेजर ला हे लागतं, मेजर ला तसंच हवं असतं, मेजर काय चाटूनपुसून हाडं खातो वगैरे. (मेजर हे त्याच्या कुत्र्याचे नाव होते, हे आपण चाणाक्षपणे ओळखलं असेलच.) पुराण चालू असताना माझ्या एका वात्रट आगाऊ मित्राने काय डायलाँग मारला माहितीये? तूझ्या मेजर ला दोन तीन दिवस उपाशी ठेव, चौथ्या दिवशी तो पोळी भाजी चटणी लोणचे पण मिटक्या मारत खातो की नाही ते बघ 😷!



सूज्ञांस अति सांगणे न लगे...

---

मिलिंद काळे, 30th January 2016

No comments:

Post a Comment