Monday, January 18, 2016

Er Rational musings #329

Er Rational musings #329



टिपीकल उडिपी रेस्टाँरंट्स बंद पडत चाललीयेत.



साधारणपणे तीस तेहत्तीस वर्षांपूर्वी उडिपी हा हा म्हणता आले. एक दूसऱ्याला मदत करणं हा यांचा स्थायीभावच, विशेष. झपाट्याने, चक्रवाढीने ही फैलावली, संपूर्ण मुंबईत पसरली.



अख्या मुंबईकरांना सुखद जेन्यूईन चवीच्या साऊथ इंडियन पदार्थांन्नी चटक लावली. पट्क्कन गरमा गरम ताजी मिळणारी वाफाळणारी इडली असो वा पापुद्रेवाला डोसा, 'भोक' वडा असो वा जाडसर उत्तप्पा, वा चार पाच भाजी/ऊसळ/डाळ/दही/स्वीट/सार असलेल्या वाट्यांसकट 'पोट'भर थाळी असो, समस्त चाकरमानी वेडेच झाले, आहारी गेले.



व्हँल्यू फाँर मनी, विथ व्हरायटी अँड विदिन नो टाईम!



विकेंड्सला कुटुंबच्या कुटुंब बाहेर खाऊ लागली. पहिले आवड म्हणून व नंतर गरज म्हणून.



पंजाबी पदार्थांचे आक्रमण असो किंवा चाट आयटमस् चे, किंवा पाव भाजीचे वा बटाटा वडा पावचे, वा सँडविचेस्, सगळ्या चवीष्ट बदलांना 'पचवत', आत्मसात, आपलेसे करत करत, साऊथ इंडियन हाँटेले आपला आविर्भाज्य घटक बनली.



धीस वाँज अ गोल्डन पिरियड; अ विन विन सिच्यूएशन, फाँर बोद - खाणारे व खिलवणारे!



पायांत चपला न घातलेले, हातात ट्रे व छोटं बिल बूक व कानात पेन खोचलेले वेटर्स, पाण्याचे ग्लास ताबडतोब बदलणारी, पटापट टेबलं साफ करणारी पोरे, काऊंटर वर बसलेला, वाटीतल्या सुट्या पैशांच्या नाण्यांशी खळ्ळ्ळ आवाज करत खेळत बसलेला मालक, ही ह्यांची खरी ओळख.



जागांच्या गगनाला भिडलेल्या किमती, ओव्हरहेड्स, कामगारांची कमतरता, व प्रचंड प्रमाणात वाढलेले टँक्सेशन, अपार्ट फ्राँम महागाबाई ह्यांचा एकत्रित विपरीत परिणाम म्हणजे उडिपी हाँटेलं नाहीशी होणं.



आणि मेन कारण म्हणजे फोफावलेल्या, दिवस उजाडल्यापासून रात्री पर्यंत फूललेल्या खाऊगल्या.



हाँटेलात पस्तीस, चाळीस, पन्नास रूपयांना मिळणारे पदार्थ वीस, तीस रूपयांत मिळायला लागले; उडिपी बंद पडतील नाहीतर काय?!



दिलसे, मिसिंग यू लव्हली उडिपीज...

---

मिलिंद काळे, 18th January 2016

No comments:

Post a Comment