Sunday, January 31, 2016

Er Rational musings #352

Er Rational musings #352



नखशिखांत, आमूलाग्र, अथ पासून इति पर्यंत, अखंड. आणि सर्वस्व



या शब्दांची ताकद बघा. यांची 'रीच' बघा. साँल्लीड आहे. रूढार्थाने.



Instead of judging it from whatever it is, one needs to look at it from whatever remains after that. Residual.



A Zero. Or a One!



Either everything is negated and reduced to a void. Or everything is transformed in unison in altogether new homogeneous entity!



अर्पण...

---

मिलिंद काळे, 31st January 2016

Saturday, January 30, 2016

Er Rational musings #351

Er Rational musings #351



खरा मित्र, सच्ची मैत्री म्हणलं की पुरूषाला त्याचा बेस्ट (मेल) फ्रेंडच आठवतो आणि स्त्रीला तिची बेस्ट (फिमेल) फ्रेंडच आठवते. व्हाईस व्हर्सा क्राँसओव्हर अगदीच अपवादात्मक, जवळपास शून्य.



व्हर्च्यूअल रिएलिटीने मैत्री ची व्याख्या छानसी माँडिफाय, एडिट केलीये, मूळ ढाच्याला धक्का न लावता.



शेवटी मैत्री म्हणजे काय? हक्काचं रडार! पण बोद वेज! मायक्रोवेव्ह, सूक्ष्म बिनतारी यंत्रणा. वातातरणातल्या सूक्ष्म लहरी. नो फिजीकल कनेक्शन. नाँट रिक्वायर्ड, इम्मटेरियल. आलटून पालटून सेंडर, रिसीव्हर चे रोल इंटरचेंज करायचे.



देवाण घेवाण. चर्चा. डिबेट. चांगल वाईट, साधक बाधक, गिव्ह बट नो टेक!



आणि स्पंदनं!!



हर एक (कमीना) फ्रेंड जरूरी होता हैं...

---

मिलिंद काळे, 31st January 2016

Er Rational musings #350

Er Rational musings #350



After a hard day, relaxation guaranteed. उत्तररात्र आपलीच आहे.



Flip thru' Mastiii, Music India, Sony Mix, 9xJalwa, E24 n B4U Music.



Gorgeous Nanda, Beautiful Sharmila, Charming Babita, Ravishing Moushmi, Stunning Mumtaj, Lovely Saira Banu, Enchanting Asha Parekh, Exquisite Waheeda, Magnificent Mala Sinha, Charming Nutan and Delightful Kalpana.



Tonight's first prize goes to



ऐ गुलबदन, ऐ गुलबदन

फूलों की महक, काँटों की चुभन

तुझे देख के कहता है मेरा मन

कही आज किसी से मोहब्बत ना हो जाये



क्या हसीन मोड़पर आ गयी जिंदगानी

के हक़ीकत न बन जाये मेरी कहानी

जब आहें भरे ये ठंडी पवन, सीने में सुलग उठती है अगन



क्या अजीब रंग में सज रही है खुदाई

के हर चीज मालिक ने सुंदर बनायीं

नदिया का चमकता है दर्पन, मुखड़ा देखे सपनों की दुल्हन



मैं तुम ही से यूँ आँखें मिलाता चला हूँ

के तुम ही को मैं तुम से चुराता चला हूँ

मत पूछ मेरा दीवानापन आकाश से उँची दिल की उड़न



गीतकार : हसरत जयपुरी,

गायक : मोहम्मद रफी,

संगीतकार : शंकर जयकिशन,

चित्रपट : प्रोफेसर (१९६२)



सदाबहार शम्मी, गर्ल नेक्स्ट डोअर वाटावी इतकीच, पण इतकीss सुंदर कल्पना. डायरेक्ट प्रेमाची साद समोरासमोर आर्जवी लाघवी पणे घालणारा शम्मी व कळत नकळत आपसूक त्याच्याकडे लोहचुंबका सारखी ओढली जाणारी कल्पना, बहोत खूब! (हे असं डायरेक्टली आँन द फेस ज्याला जमलं तो, जो जीता वही सिकंदर, रेस्ट 'अल्सो रँन'!!)



माझं फेवराईट गाणं व सिनेमा सुध्दा...

---

मिलिंद काळे, 31st January 2016

Er Rational musings #348

Er Rational musings #348



पोस्टमनsss



सर्वपरिचीत हाक, काळाच्या ओघात दूरावलीये. मेल बाँक्सेस तळमजल्याला. प्रत्येकाच्या नावानिशी. त्यामूळे प्रत्यक्ष संबंध दोनच वेळा; स्पीडपोस्ट असेल तेव्हा व 'दिवाळी'च्या पूढे पाठी!



पूर्वी तार (telegram) आली की भितीयुक्त कुतूहल वाटायचं. मनी आँर्डर द्वारा हाँस्टेल मधल्या मुलांना पैसे 'पोस्ट' केले जायचे. राखी पोर्णिमेच्या आसपास राख्या यायच्या. मकर संक्रांतिच्या आसपास तिळगूळ हलवा यायचा. दिवाळीच्या आसपास साध्या पोस्ट कार्डावरील शूभेच्छा (साधं सिंपल पणती बिणती काढलेलं) यायच्या. बोर्डाच्या परीक्षांचा निकाल पण यायचा व नवीन नोकरीचं अपाँईंटमेंट लेटर पण यायचं.



लेकिन अभी कूरीयर, नेटबँकिंग, और वर्क फ्राँम होम का जमाना हैं।



परंतू आता पोस्टल डिपार्टमेंटनेही कात टाकलीये.



प्रोफेशनँलिझ्म, प्रगत तंत्रज्ञान, व पंक्च्युअँलिटी मध्ये थोsडे हे स्लो असतील पण खूप मागे नाहीयेत हे बरिक खरं नक्कीच आहे!



आणिक याउप्पर जबाबदारीने मला नमूद करायला काहीच संकोच नाही वाटत की बेजबाबदारपणा, कामचुकारपणा, इनएफिशियन्सी, व भ्रष्टाचार (!), या अशा सर्व डिपार्टमेंट्स मध्ये (सरकारी) पोस्टल डिपार्टमेंटचा शेवटून पहिला दूसरा तिसरा चौथा नंबर असेल!!



ऊन, थंडी, पाऊस, वारा, डिस्टन्स, कशाकशाची पर्वा न करता तंगडतोड करत, आपल्या दारी येणाऱ्या पोस्टमन ला गुळ-पाणी (!!), साँरी, चहा पाणी (अँटलीस्ट) विचारण्याची तसदी घेऊया का?



What a great yeoman's service...

---

मिलिंद काळे, 30th January 2016

Friday, January 29, 2016

Er Rational musings #347

Er Rational musings #347



काही लोक्सचं श्वान प्रेम व माऊ प्रेम बघून गलबलायला होतं.



प्राणी पाळीव कधीपासून सार्वत्रिक, सार्वजनिक झाले, माहीत नाही. परंतु, पुरातत्व प्राचीन कालापासून कुत्रा वगैरे, आपल्या देवांसोबत, राजे दरबारी असावेतच, कारण याचा उल्लेख सापडतो. आम आदमी कधीपासून 'ह्यात' 'घूसला', हा संशोधनाचा विषय असावा, असो.



कुत्रा,मनीमाऊ पाळायची ठरली, की मग सुरवातापासून दोन तट पडतात घरोघरी. हा प्राणी घरचाच होणार. त्याची शू शी कोण काढणार. तूम्ही सगळे बघणार आहात का? मलाच बघाव करावं लागणार. असे अनेक! अर्थातच, जर कुटुंबप्रमूखी च जर पाळायच्या बाजूने, मुला टोरांच्या बाजूने असेल तर फूल्लस्टाँप, चर्चेला विराम ☺!



मग होतं 'गाढवी' प्रेम! आमचा प्रिन्स ना पेढे सुध्दा खातो. त्याला फक्त मटण चाँप्स लागतात. आमची माऊ ना माझ्या च बिछान्यात झोपते. दूसरं कोणी पलंगावर बसलेलं पण तिला आवडत नाही वगैरे वगैरे. 😛!



असंच एकदा आम्ही काही मित्र, आमच्या एका श्वान प्रेमी मित्राकडे गेलो होतो. सहाजिकच त्या श्वानामालकाची कौतूक बडबड सुरू झाली. मेजर ला हे लागतं, मेजर ला तसंच हवं असतं, मेजर काय चाटूनपुसून हाडं खातो वगैरे. (मेजर हे त्याच्या कुत्र्याचे नाव होते, हे आपण चाणाक्षपणे ओळखलं असेलच.) पुराण चालू असताना माझ्या एका वात्रट आगाऊ मित्राने काय डायलाँग मारला माहितीये? तूझ्या मेजर ला दोन तीन दिवस उपाशी ठेव, चौथ्या दिवशी तो पोळी भाजी चटणी लोणचे पण मिटक्या मारत खातो की नाही ते बघ 😷!



सूज्ञांस अति सांगणे न लगे...

---

मिलिंद काळे, 30th January 2016

Thursday, January 28, 2016

Er Rational musings #345

Er Rational musings #345



माझी माध्यमिक शाळा वामनराव मुरांजन!



वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालय. पुरंदरे. व मुलुंड विद्यामंदिर. मराठी माध्यम. (उतरत्या क्रमानं!!)

सेंट पायस. फ्रेंड्स. व सँमसन. इंग्रजी माध्यम. (उतरत्या क्रमानं!!)

आणि म्युनिसिपालटीच्या 2-3.

आणि छोट्या मोठ्या चिटूकल्या चंदनबाग, दयानंद सरस्वती, ज्ञानसरिता, मोतीपछान वगैरे.

उण्यापुऱ्या 12, 13, 15 शाळा. एकोणीसशे ऐशीच्या दरम्यान, मुलुंड मध्ये.



त्यातही क्वालिटेटीव्ह क्रमवारी करायची तर माझी वामनराव सर्वश्रेष्ठ!! अर्थातच, काय प्रश्न आहे काय?!!



ट्यूशन क्लासेस म्हणलं तर आमची मजल (दरमजल) सिनकर सर किंवा भडंग सर. नंतर ठाण्याचं कर्नावट, काँमर्स साठी वा दादरचं अगरवाल सायन्स साठी!



काँलेज म्हणजे फक्त मुलुंड काँलेज आँफ काँमर्स.



बस्स, संपला विषय!



याच शाळा काँलेजांनी, मुलुंडने त्याकाळी समकालीन अनेक दिग्गज, निरनिराळ्या क्षेत्रातले, घडवले.



काही नामोनिर्देश, केवळ उदाहरणार्थ, प्रातिनिधिक.



~ नामवंत कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हा माझा बँचमेट, मित्र.

~ माझा मित्र रणजीपटू रवी ठाकर.

~ सीए व सीएस, दोन्ही परीक्षांत भारतात पहिला क्रमांक पटकावलेला माझा मित्र, ज्येष्ठ अर्थतज्ञ डाँ अभिजीत फडणीस.

~ काँमनवेल्थ गेम्स मध्ये भारतातर्फे दूहेरी स्पर्धा खेळलेला बँडमिंटनपटू रवी कुंटे.

~ ग्लँक्सो सारख्या मल्टीनँशनल कंपनीचा कंपनी सेक्रेटरी, माझा मित्र अजय नाडकर्णी.

~ विश्वसुंदरी युक्ता मूखी इथलीच.

~ रिअल इस्टेट क्षेत्रात क्रांती घडवणारा निर्मल ग्रूपचा धर्मेश जैन, माझा पूर्वाश्रमीचा लायन्स क्लबचा टेबल टेनीस पार्टनर, इथलाच.



आणि आत्ताचा



अजिंक्य रहाणे पण इथलाच. हार्ड कोअर, बाँर्न अँड बाँट अप मुलुंड!



आत्ताच्या घडीला जवळपास, पन्नासच्या आसपास शाळा मुलुंडमध्ये आहेत. एसएससी, आयसीएससी, सीबीएससी बोर्डांच्या. चमत्कारिक नावाच्या पण, जसे बाँगी (बिल्लाबाँग), होरी (होरायझन) इत्यादि. याव्यतिरिक्त शेकडोंन्नी ट्यूशन क्लासेस आहेत. बारा पंधरा काँलेजेस् आहेत.



परंतू, छापखाने झाले बहू असे वाटते कधीकधी.



कारण, युनीक, एकमेवाद्वितीय, लक्षणीय, चमकदार, नेत्रदिपक अशी कामगिरी कोणी कोणत्या क्षेत्रात केल्याचं, गेल्या काही वर्षांत ऐकिवात नाही.



अरे, कुठे नेवून ठेवलय मुलुंड माझं...

---

मिलिंद काळे, 28th January 2016

Wednesday, January 27, 2016

Er Rational musings #344

Er Rational musings #344



प्रेम करावं मनापासून. दिलसे. मोरपिशी. तारूण्य सुलभ. उत्कट. वेडं, वेड लावणारं, वेड्यासारखं. .



मात्र व्यक्त वेळीच केलेल बरं! म्हणजे जर ती म्हणाली की व्हाय आर यू वेस्टींग यूवर टाईम व माय टाईम अल्सो, तर नकाराला सामोरं जावून नंतर एकतर्फी असलं तरी काही हरकत नाही. ती दूरून आवडतच राहील ना? मग वन वे स्ट्रीट...



दोन्ही बाजूनी होकार असेल तर मात्र आणखीनच सांभाळून. वर्ड आँफ काँशन: ट्रँडिशनल प्रेमी युगुले, उदाहरणार्थ

रोमियो ज्यूलियट, हीर रांझा, लैला मजनू, सलीम अनारकली, शिरीन फरहाद इ सारखं "नको"!! नकोच नको. कारण,



कारण या कुठल्याही जोडीचे लग्न झाले नाही, त्यांनी एकत्रित संसार केला नाही! त्यांनी आयुष्य एकत्रित नाही घालवल, घालवूच शकले नाहीत ते; सो सँड. म्हणायला ठीक आहे हो.



अर्थातच, शेवटी लग्न म्हणजे सर्वस्व का? व्हेदर द एन्ड जस्टिफाईज द मिन्स?



हे असले फेक्यूलर (!) पुरवोगामी (!) प्रश्न आहेतच...

---

मिलिंद काळे, 27th January 2016

Tuesday, January 26, 2016

Er Rational musings #343

Er Rational musings #343



आपल्या (मित्र मैत्रिणींच्या, जून्या ओळखीच्या व्यक्तिंच्या सुध्दा!), मुला मुलींचे फब वरचे अपडेट्स समजायला, त्यांचेे फोटो बघायला, त्यांची प्रगती कळायला, त्यांच्या पोस्तस् वाचायला, मला खूप छान वाटते. कौतूक वाटतय त्या सगळ्यांना अँडल्ट झालेल बघून.



Would we have thought about this day, such happenings, during our school days? College days? Impossible.



असं नाहीये की आपले दूसरे 'उद्योग' चालू होते, प्रायाँरिटीज वेगळ्या होत्या, एवढा विचार करायची शक्यताच नव्हती वगैरे. इच्छाच नव्हती, तयारी नव्हती, गरजच नव्हती, काही कारणच नव्हते.



But I am enjoying @ll now. No regrets. Our grown up children!! We have also 'grown', n growing older (period)!



लाडक्या मुला मुलींनो, असेच यशवंत किर्तीवंत व्हा, मोठे व्हा. मनाजोगा साथीदार मिळवा!! 😍



You would have earned it. Isn't it...

---

मिलिंद काळे, 26th January 2016

Monday, January 25, 2016

Er Rational musings #340

Er Rational musings #340



मैं और मेरी तनहाई, अक्सर ये बाते करते हैं



तुम होती तो कैसा होता

तुम ये कहती, तुम वो कहती

तुम इस बात पे हैरान होती

तुम उस बात पे कितना हँसती

तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता



मैं और मेरी तनहाई, अक्सर ये बाते करते हैं



ये कहाँ आ गए हम, यूँ ही साथ साथ चलते

तेरी बाहों में हैं जानम, मेरे जिस्म-ओ-जान पिघलते



ये रात हैं या, तुम्हारी जुल्फे खुली हुयी है

है चांदनी या तुम्हारी नज़रों से मेरी राते धुली हुयी है

ये चाँद है, या तुम्हारा कंगन

सितारे है, या तुम्हारा आँचल

हवा का झोंका है, या तुम्हारे बदन की खुशबू

ये पत्तियों की हैं सरसराहट, के तुम ने चुपके से कुछ कहा है

ये सोचता हूँ, मैं कब से गुमसुम

के जब के, मुझको को भी ये खबर है, के तुम नहीं हो, कही नहीं हो

मगर ये दिल हैं के कह रहा है, तुम यही हो, यही कही हो



तू बदन है, मैं हूँ छाया, तू ना हो तो मैं कहाँ हूँ

मुझे प्यार करने वाले, तू जहाँ हैं मैं वहाँ हूँ

हमे मिलना ही था हमदम, किसी राह भी निकलते

मेरी सांस सांस महके, कोई भीना भीना चन्दन

तेरा प्यार चांदनी है, मेरा दिल हैं जैसे आँगन

हुयी और भी मुलायम, मेरी शाम ढलते ढलते



मजबूर ये हालात, इधर भी है, उधर भी

तनहाई की एक रात, इधर भी है, उधर भी

कहने को बहुत कुछ हैं मगर किस से कहे हम

कब तक यूँ ही खामोश रहे हम और सहे हम

दिल कहता हैं दुनियाँ की हर एक रस्म उठा दे

दीवार जो हम दोनों में है, आज गिरा दे

क्यों दिल में सुलगते रहे, लोगों को बता दे

हां हम को मोहब्बत है, मोहब्बत है, मोहब्बत

अब दिल में यही बात, इधर भी है, उधर भी



Movie: Silsila / 1981

Music: Shiv-Hari / Hariprasad Chaurasia / Shivkumar Sharma

Lyrics: Javed Akhtar

Singers: Amitabh Bachchan, Lata Mangeshkar



आई शप्पथ, काय गाणं आहे यार. काय बोलावं?



(Incidentally, Rekha was awarded 'Yash Chopra Smruti Puraskar' today.)



प्रेम कहाण्या अधूऱ्या च रहायचाच जमाना होता तो; पडद्यावर (व प्रत्यक्षात देखील) ☺



ट्रँजेडी किंवा त्रांगडं. तेव्हाचं. एकतर्फी प्रेम - तथाकथित प्रेयसी चा नकार, झिडकारणं, अव्हेरणं व धुडकावून लावणं. समज, गैरसमज. विश्वास, अविश्वास. एकी कडूनच प्रियकराचे साद घालणं, आपणच झूरणं, ओढवून घेतलेली वैफल्यग्रस्तता. उगीचच. {अरे मूर्ख माणसा, ती तूला लायकच नव्हती रे.} वेस्टेज आँफ हिज टाईम अँड हर टाईम अल्सो. 😪



काही वेळा केवळ निव्वळ परिस्थिति, सिलसिला सारखी. नशीबाचे पत्ते. 😍



रे (रेखा) अमिताभा...

---

मिलिंद काळे, 25th January 2016

Er Rational musings #339

Er Rational musings 339



मऱ्हाठी, अर्र, मराठी भाषा समृध्द आहे. वळवावी तशी 'ही' वळते 'असेही' म्हणतात. आपली बोली, आपला बाणा.

द्वयार्थी शब्द असंख्य. शिवाय आपण कसं 'बघतो', कसं 'घेतो', कसं 'ऐकतो' कसं ही कसंसस 'बोलतो'ना तेही महत्वाचे.



आता जरा मजेशीरपणा; शब्द, वाकप्रचार, बोली भाषेतला वापर, वगैरे. वानगीदाखल. नो हार्ड फिलींग्ज!



'घाल' आणि 'वाढ' यात फरक आहे.

जेवायला बसलो की भाजी/चटणी/कोशिंबीर/चटणी/पोळी/भात इ 'घाला' असं नाही म्हणायचं, तर भाजी/चटणी/कोशिंबीर/चटणी/पोळी/भात इ 'वाढा' अस म्हणायचं! आमटी/डाळ इ सुध्दा 'वाढायची' असते, 'ओतायची' नसते. चहा 'ओता', चालेल.



'जातो' आणि 'येतो' यात फरक आहे.

चला बाय, मी 'जातो', असे न म्हणता, चला बाय, मी 'येतो', असे म्हणावे. (माणूस जातोय, बाहेर चाललाय, तो परत येण्यासाठीच ना?)



'मिळणे' आणि 'भेटणे' यात फरक आहे.

बस 'मिळेल' असे म्हणावे, बस 'भेटेल' असे नाही. तिकीटे 'मिळतील' असे म्हणावे, तिकीटे 'भेटतील' असे नाही.



काही 'सकृतदर्शनी' टिपीकल 'ब्राह्मणी' बोली आणि ब्राह्मणेतर (!) शब्दच्छल.



~ पत्यांतील राजा व्हर्सेस बादशहा तसेच गोटू व्हर्सेस गुलाम

~ काकू आणि काकी

~ तिकूडनं आणि तिकडून

~ बिरड्या आणि डाळिंबी

~ मासे आणि मच्छी

~ पोळी आणि चपाती (पण नाँर्मल बर का. कारण पूरण 'पोळी'च असते व गुळाची ही 'पोळी'च असते, पूरण 'चपाती' व गुळाची 'चपाती' असं काही नसतं.)



मी मराठी, 'माय' मराठी...

---

मिलिंद काळे, 25th January 2016

Friday, January 22, 2016

Er Rational musings #337 part 2

http://www.youtube.com/watch?v=FJqkdDo3OrE&sns=sms

---

मिलिंद काळे, 22nd January 2016

Er Rational musings #337

Er Rational musings #337



आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू

जो भी है बस यही एक पल है



अनजाने सायों का राहों में डेरा है

अनदेखी बाहों ने हम सब को घेरा है

ये पल उजाला है, बाकी अंधेरा है

ये पल गवाँना ना, ये पल ही तेरा है

जीने वाले सोच ले, यही वक्त है कर ले पूरी आरजू



इस पल के जलवों ने, महफ़िल सवारी है

इस पल की गर्मी ने धड़कन उभारी है

इस पल से होने से, दुनियाँ हमारी है

ये पल जो देखो तो, सदियों पे भारी है

जीने वाले सोच ले, यही वक्त है कर ले पूरी आरजू



इस पल के साये में अपना ठिकाना है

इस पल के आगे फिर हर शय़ फसाना है

कल किस ने देखा है, कल किस ने जाना है

इस पल से पायेगा, जो तुझ को पाना है

जीने वाले सोच ले, यही वक्त है कर ले पूरी आरजू



गीतकार : साहिर लुधियानवी,

गायक : आशा भोसले,

संगीतकार : रवी,

चित्रपट : वक्त (१९६५)



आज, आत्ता, ताबडतोब नावाची एक मनोरंजक मराठी कार्यक्रम काही वर्षांपूर्वी सादर व्हायचा, सूत्रधार अतुल परचुरे.



वरील गीत हेच सांगते. नो नाँनसेन्स. जे आहे ते इथे, आत्ताच. हाच तो क्षण. कशाला उद्याची बात. फुकाचा वादा. हा क्षण जगा. काय वर्डिंग, चाल, संगीतलय.



वक्त! 50 वर्षांपूर्वीचा मल्टी स्टार कास्ट स्टडेड विथ टाँल अँक्टर्स लाईक बलराज सहानी, राज कुमार, शशी कपूर, सुनील दत्त, साधना, शर्मिला टागोर, शशीकला, रहमान  इ.



ऐ मेरी जोहराजबी सारखी महफिल चेतवणारी अफलातून पेशकश यातलीच.



आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू च्या लयीवर लयबध्द संथ पदलालित्य, दोन मेन कपल्स व रेहमानचे सिगारेटचे धुरांडे!

मेलोडीयस!



व्वाँव...

---

मिलिंद काळे, 22nd January 2016

Thursday, January 21, 2016

Er Rational musings #336

Er Rational musings #336



Originality is the key. Originality in any form. It's spontaneous. It's from the heart, from bottom of the heart. It's an expression. From within. It's a statement.



I hardly give cognizance to the forwarded posts on Whatsapp. Forwarded jokes, सुविचार, images, videos, good morning, good night posts et al. Not that those are sent in bad intention. All are good. (and such posts invariably land onto your Whatsapp from one friend or the other, or sometimes from many groups!) Not my type, really. To forward, I mean.



But what an instant messenger, a network spread across boundaries.



Thanks Whatsapp, Thanks Jan Koum n Brian Acton



Anything raw, pure, n uncut is @lways welcome! @ny which way.



Similarly, Facebook is an open forum, a widespread platform, accessible to all. Expression n Impression of Soul n spirit. On the stage. A public domain. Directed to friends, redirected towards friend's friend's n the chain. A chain link fencing. But fencing of unknown perimeter, in fact!



We get to read, enjoy n appreciate very good posts on FB, even though you don't know the person.



Thanks Facebook, Thanks Mark Zuckerberg...

---

मिलिंद काळे, 22nd January 2016

Er Rational musings #335

Er Rational musings #335



लहानपणी दररोज शुभं करोती म्हणायची शिकवण होती, आज्जीची. आमच्या बरोबर ती सुध्दा म्हणायची.



दिवेलागण झाली की स्टार्ट करायचो.



शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा

शत्रुबुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोsस्तुते

दिव्या दिव्या दिपोत्कार कानी कुंडले मोतीहार

दिव्याला पाहून नमस्कार।



ही उजेडाला उद्देशून केलेली वंदना.



मग, इतर काही श्लोक

भीम रूपी महा रुद्रा वज्र हनुमान मारूती

वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना...



मग रात्री रामरक्षा,

असस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य...



सकाळी उठल्यावर

कराग्रे वसते लक्ष्मी: कर मध्ये सरस्वती,

करमुले तू गोविंद: प्रभाते करदर्शनम्...



All are self explanatory.



श्रध्दा (!), पण बरे वाटायचे!

मोठ्यांचे ऐकायचेच, त्यातून आज्जी अण्णा म्हणजे प्रश्नच नाही.



आणि सगळ्यांमध्ये मला आवडायचे ते, झोपताना म्हटलेला श्लोक!



बोललेल्याचा जप होतो,

चाललेल्याच्या प्रदक्षिणा होतात,

जेवलेल्याचा नैवेद्य होतो,

झोपलेल्याचा तूला साष्टांग दंडवत.



आस्तिक नास्तिक काळभैरव.



जबरदस्त प्रोफाऊंडली मिनिंगफूल...

---

मिलिंद काळे, 21st January 2016

Wednesday, January 20, 2016

Er Rational musings #334

Er Rational musings #334



हाँटेल जेव्हढं कळकट मळकट, तेव्हढी उत्कृष्ट चव असते, येथे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांना; असा माझा स्वानुभव आहे; अशी माझी ठाम समजूत आहे.



कळायला, कमवायला लागल्या पासून मी नि:संकोच पणे, अशा हाँटेल्स मध्ये जातो.

आवर्जून जातो. नजर शोधतच असते. त्या त्या वेळेनुसार व भूक तहाने नुसार बिनदिक्कत खातो पीतो.



वडा पाव, पाव पँटीस, समोसा, भजी, उसळ मिसळ पाव, भूर्जी पाव, आँमलेट, हाफ फ्राय, बाँईल्ड एग पाव, खिमा, मटण चिकन, बैदा मसाला, रोट्या, भात सूरवा वा डाळ मारून, व्हेज नाँन व्हेज थाळी, डाल राईस, बिर्याणी, तवा पुलाव, चायनीज फ्राईड राईस, ते अगदी शिरा पोहे उपमा, इ इ सारख्याच प्रेमाने खातो. बाकडं असो वा खूर्ची. खाण्याची वेळ नसेल, भूक नसेल, इच्छा नसेल तर चहा मात्र हा हवाच, काहीच नाही तर.



पूऱ्या आयुष्यात शेकडो हाँटेले, टपऱ्या पालथ्या घातल्या असतील, पादक्रांत केल्या असतील.



खाण्यावरच बोलायचं झालं तर मला थंड शीत पेये, आईसक्रीम, दही, तूप, मीठ, लिंबू अजिबातच नको असते. गोड पक्वान्न म्हणजे श्रीखंड बासूंदी गुलाबजाम गुळाची पोळी पुरणाची पोळी जिलेबी इ वर्ज्य, त्याज्य! परंतू समोर येईल ते, पानात पडेल ते, एकदा खायचे, संपवायचे अशी 'चांगली' शिकवण आज्जीने लावलीये. त्यानुसार सगळे वरचे गोड पदार्थ खातो पण आवडीने नाही. असो.



सांगायचा मुद्दा असा, की हे विश्वची माझे घर प्रमाणे वागलो तर या 'विश्व' कर्मा चे शुभाशीर्वाद पाठराखण केल्या शिवाय रहात नाहीत.



थर्ड रेटेड ते फर्स्ट ग्रेड हाँटेल सर्वत्र सारख्याच ईझ मधे वावरा; इक्वली आवडीने, मिटक्या मारत, कौतुक करत, व आभार मानोमनी मानत मानत खा.



अन्न हे पूर्णब्रम्ह.



वदनी कवळ घेता नम घ्या श्रीहरीचे |

सहज हवन होते नाम घेता फुकाचे |

जीवन करि जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रम्ह। उदारभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ||



गोविंद...

---

मिलिंद काळे, 20th January 2016

Tuesday, January 19, 2016

Er Rational musings #333

Er Rational musings #333



नटसम्राट काल रात्री बघितला. (10.35 चा शो!)



पंचवीस तीस वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. दत्ता भट व डाँ श्रीराम लागूं सारख्या दिग्गजांनी कुसूमाग्रजांच्या ह्या एपिक महा नाटकाला प्रचंड उंच उंचीवर नेवून ठेवले होते. तद्नंतरच्या प्रत्येक नटसम्राटाने, अगदी आत्ता आत्ता पर्यंत आपापल्या परीने डिफरंट डायमेन्शन दिलेय.



असलं अजरामर महा नाटक चित्रपट रूपांत साजरं करायचे म्हणजे डिफरंट डायमेन्शनच, महा आव्हानच जणू. पेललय, पेलवलय, बऱ्यापैकी. परंतु, पण तितकंच (पिरियड)!



सिनेमँटिक लिबर्टीची म्हणे आजकाल गरज असते. पटकथेमध्ये, संवादांमध्ये काळास्वरूप, काला'बाद'नुसार बदल करावे लागतात. रंगमंच व पांढरा पडदा, दोन्ही सापेक्ष माध्यमे आहेत. पार्श्वसंगीत, स्वगतं, कट सीन्स, एडिटिंग, कला, वेषभूषा, सिनेमँटोग्राफी, रंगसंगती मिक्सींग, क्लोज अप शाँट्स व कथेच वर्तमान भूतकाळात सोप्प येणं जाणं अशा गोष्टींमूळे सिनेमा उजवा ठरू शकतो, नाही, सिनेमाने वेगळीच उंची गाठता येऊ शकते, नव्हे, गाठायलाच पाहिजे.



साँरी टू से, विथ आँल सेड अँड डन, "नटसम्राट, असा नट होणे नाही", अपेक्षीत परिणामकारक होत नाही, ही वस्तुस्थिति आहे, दूर्दैवी.



दारूच्या सीन ने सुरू झालेला, दारूच्या सीन ने मध्यांतर करणारा, उत्तरार्धात फास्ट पकड घ्यायचा प्रयत्न करतो. मध्येच लक्ष्यवेधी, मध्येच लक्षवेधी. मध्येच उत्कंठा वर्धक, मध्येच - अरे ज 'रा' अजून - अशी चूटपूट, मध्येच थोडं अवांतर मध्येच थोsड सवांतर समांतर!



{सिग्नेचर व्हिस्की ची बाटली बँकग्राऊंडला चूकून दिसते. सत्तर ऐशी मध्ये डाँज गाडी (लग्नाच्या वरातीतील) व जावयांची जीप गाडी बरोब्बर दाखवलीये, पण सिग्नेचर? (तेव्हा नव्हतीच!)}



नाना व विक्रम गोखलेंकडून असा अभिनय हवाच, इट्स अ मिनिमम रिक्वायरमेंट. तांत्रिक बाबी हल्ली नेटक्या, देखणीय असतातच, दँट इज अ मिनिमम रिक्वायरमेंट. इतर अंगं सुध्दा ओके, दँटस् अ मिनिमम रिक्वायरमेंट. अँड नाऊ अडेज दोज आर तुलनेने क्वाईट सहज शक्य. सर्वांत महत्वाचं म्हणजे दिग्दर्शन. जमलय बऱ्यापैकी, तरीही रूखरूख राहते(च). खूप वाव होता असं वाटतं राहतं. .



शिवधनुष्यच हे खरतर.



पण, काहीतरी कोठेतरी चुकलय, नक्कीच...

---

मिलिंद काळे, 20th January 2016

Er Rational musings #332

Er Rational musings #332



नव परिक्रमा, नव माध्यम

नव संयोजना, नव उपक्रम

नवीच इनिंग, नव संगम

जूनं कौशल्य, जूनं लेबल

जूनं धोरण, जूनं डाँगल

जूनीच वाईन, इन न्यू बाँटल?



तरीही, शेवटी



Que Sera Sera, whatever will be, will be...

---

मिलिंद काळे, 19th January 2016

Monday, January 18, 2016

Er Rational musings #331

Er Rational musings #331



Hey, just been to my favourite Mamledar Misal.



Had usual, as per ritual 2 मिसळी व 2 पाव. Savouring, appreciating, nodding in silence.

Mobiles switched off, shirt sleeves folded, handkerchief on the lap.

दाद देत, बहुतेक वेळ डोळे मिटून, मनोमनी ह्या नितांतसुंदर चवी ला सलाम.

Thanks Mamledar.

I love you...



अभिषेकी बुवांची माफी मागून,

मामलेदार मिसळीला अनुबोधून...



शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले

प्रथम तुला बघियले आणिक घडू नये ते घडले



अर्थ नवा खाण्यास मिळाला

स्वाद नवा अन्‌ बाज निराळा

त्या दिवशी का प्रथमच माझे तोंड सांग अवघडले ?



होय म्हणालिस नकोनकोतुन

तूच व्यक्त झालीस ओठांतुन

नसता कारण व्याकुळ होऊन उगिच पोट अवघडले



आठवते तडसेच्या रात्री

लाळ जीभ विरघळले गात्री

चवीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले



हेssss शब्दांच्या पलिकडले...

---

मिलिंद काळे, 18th January 2016

Er Rational musings #330

Er Rational musings #330



यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥



परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥



Traditional n orthodox meaning:

"Whenever virtue subsides and wickedness prevails, I manifest Myself. To establish virtue, to destroy evil, to save the good, I come from Yuga (age) to Yuga."



Contemporary n Unorthodox meaning:

"You see, nobody is going to come to help you. Nobody on earth can help you, except Yourself. First. And then there will be a flood. Flood of help n support. From unexpected n unknown quarters. Not The Divine, but almost equal to."



Whenever going gets tough, toughs get going.



How? This way...



~ Tame your fears

~ Re-train your brain

~ Start with what you know

~ Unlock your power

~ Understand your emotions

~ Invest in yourself



Thereafter, leave it to the destined destiny...

---

मिलिंद काळे, 18th January 2016

Er Rational musings #329

Er Rational musings #329



टिपीकल उडिपी रेस्टाँरंट्स बंद पडत चाललीयेत.



साधारणपणे तीस तेहत्तीस वर्षांपूर्वी उडिपी हा हा म्हणता आले. एक दूसऱ्याला मदत करणं हा यांचा स्थायीभावच, विशेष. झपाट्याने, चक्रवाढीने ही फैलावली, संपूर्ण मुंबईत पसरली.



अख्या मुंबईकरांना सुखद जेन्यूईन चवीच्या साऊथ इंडियन पदार्थांन्नी चटक लावली. पट्क्कन गरमा गरम ताजी मिळणारी वाफाळणारी इडली असो वा पापुद्रेवाला डोसा, 'भोक' वडा असो वा जाडसर उत्तप्पा, वा चार पाच भाजी/ऊसळ/डाळ/दही/स्वीट/सार असलेल्या वाट्यांसकट 'पोट'भर थाळी असो, समस्त चाकरमानी वेडेच झाले, आहारी गेले.



व्हँल्यू फाँर मनी, विथ व्हरायटी अँड विदिन नो टाईम!



विकेंड्सला कुटुंबच्या कुटुंब बाहेर खाऊ लागली. पहिले आवड म्हणून व नंतर गरज म्हणून.



पंजाबी पदार्थांचे आक्रमण असो किंवा चाट आयटमस् चे, किंवा पाव भाजीचे वा बटाटा वडा पावचे, वा सँडविचेस्, सगळ्या चवीष्ट बदलांना 'पचवत', आत्मसात, आपलेसे करत करत, साऊथ इंडियन हाँटेले आपला आविर्भाज्य घटक बनली.



धीस वाँज अ गोल्डन पिरियड; अ विन विन सिच्यूएशन, फाँर बोद - खाणारे व खिलवणारे!



पायांत चपला न घातलेले, हातात ट्रे व छोटं बिल बूक व कानात पेन खोचलेले वेटर्स, पाण्याचे ग्लास ताबडतोब बदलणारी, पटापट टेबलं साफ करणारी पोरे, काऊंटर वर बसलेला, वाटीतल्या सुट्या पैशांच्या नाण्यांशी खळ्ळ्ळ आवाज करत खेळत बसलेला मालक, ही ह्यांची खरी ओळख.



जागांच्या गगनाला भिडलेल्या किमती, ओव्हरहेड्स, कामगारांची कमतरता, व प्रचंड प्रमाणात वाढलेले टँक्सेशन, अपार्ट फ्राँम महागाबाई ह्यांचा एकत्रित विपरीत परिणाम म्हणजे उडिपी हाँटेलं नाहीशी होणं.



आणि मेन कारण म्हणजे फोफावलेल्या, दिवस उजाडल्यापासून रात्री पर्यंत फूललेल्या खाऊगल्या.



हाँटेलात पस्तीस, चाळीस, पन्नास रूपयांना मिळणारे पदार्थ वीस, तीस रूपयांत मिळायला लागले; उडिपी बंद पडतील नाहीतर काय?!



दिलसे, मिसिंग यू लव्हली उडिपीज...

---

मिलिंद काळे, 18th January 2016

Saturday, January 16, 2016

Er Rational musings #328

Er Rational musings #328

विरह म्हणजे कमतरता. कमतरतेची जाणीव व त्याच जाणीवेमुळे जाणवणारी उणीव. उणीव भासल्याने घुसमटणारी व्याकूळता. व्याकुळतेशी संलग्न आतुरता. आतुरता म्हणजे आर्त का झुरता?!

A personal, very personal emotional touch by OP Nayyar & Asha...

चैन से हमको कभी आप ने जीने ना दिया
जहर भी चाहा अगर पीना तो पीने ना दिया

चाँद के रथ में रात की दुल्हन जब जब आयेगी
याद हमारी आप के दिल को तड़पा जायेगी आप ने जो है दिया, वो तो किसी ने ना दिया

आप का गम जो इस दिल में दिनरात अगर होगा
सोच के ये दम घुटता है फिर कैसे गुजर होगा
काश न आती अपनी जुदाई, मौत ही आ जाती
कोइ बहाने चैन हमारी रूह तो पा जाती
एक पल हँसना कभी दिल की लगी ने ना दिया

गीतकार : एस. एच. बिहारी,
गायक : आशा भोसले,
संगीतकार : ओ. पी. नय्यर,
चित्रपट : प्राण जाये पर वचन न जाये (१९७३)

मास्टरपीस. चित्रिकरण झालेलं हे गीत फायनली प्रिंट मधून कट केलं गेलं. फिल्म फेअर पुरस्कार स्विकारायला सुध्दा अाशा हजर नाही राहीली. ओपी ने स्विकारला, व बिहारी बाबूं सोबतीने गाडीतून परतताना खिडकीतून बाहेर फेकून दिला.

Asha Bhonsle's last song, sung under OP's music direction.

What a tragic End!
---
मिलिंद काळे, 16th January 2016

Friday, January 15, 2016

Er Rational musings #327

Er Rational musings #327



बादरायण संबंध



मित्र, बराच मोकळा वेळ, चहा, कँज्युअल बैठक, कधीतरी दारू पार्टी, गप्पा, वेगवेगळे विषय, घर, काम, धंदा, खेळ, राजकारण, सिनेमे, नाटकं, मारलेल्या टूर्स, समाजकारण, शिळेप्याच्या गप्पा, अवांतर, मित्राचा मित्र, एकत्र बैठक, दारू, गप्पा कंटिन्यूड, त्याची ओळख, रेफरन्स, फोन काँल, ई मेल, मिटिंग, ज्युनियर मिडल लेव्हल पर्सन, वेगळे डिपार्टमेंट, रेफरन्स, रि डायरेक्शन, कन्सर्नड आँथाँरिटी, काम.



The problem nowadays is that there is tremendous importance to the reference. Whether it's a new job, or job change, or even profile change, or professional work, everyone gives priority to the reference (and recommendation) from known source. The direct the reference, the better the chances of trust, and ultimately, a job or whatever.



हा ह्याच्याकडून आलाय, ह्याचे काम करूया. ह्याच्याकडून, म्हणजे आपल्या मित्रा कडून, किंवा मित्राच्या मित्राकडून किंवा मित्राच्या ओळखीने. ओळख वाढते कशामुळे? सहवास, भेटीगाठी, आवड, चर्चा, चाय पे चर्चा किंवा, किंवा, hold your breathe! दारू पिताना चर्चा! The persons who enjoy each other's company, drink together merrily, spend individual valuable time for mutual benefit and readily ready to help is JUST because of common thread ie दारू.



And rightly so!



Whether we like it or not, it's a proven psyche that दारू plays a vital role. अर्थातच दारू पार्टी म्हणजे सर्वस्व किंवा हे एकच कारण आहे वा न पिणारे जगत नाहीत का वगैरे इत्यादि, agreed, fully.



But still...

---

मिलिंद काळे, 16th January 2016

Er Rational musings #325

Er Rational musings #325



खऱ्या खवय्यांसाठी फूड फेस्टिवल, मग ते कोणाचेही असो, म्हणजे एक पर्वणीच.

निमित्त आजचे ठाण्यात भरलेले सीकेपी फूड फेस्टिवल.



नाममात्र का होईना, प्रवेश शुल्क ठेवले की क्राऊड जेन्यूईन येतो.



अनेक पदार्थ; अर्थातच सामिष मेजवानी साठीच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू उर्फ सी के पी (काही जण चोरून काढलेली पोरं (!) असाही लाँग फाँर्म करतात, आता काय बोलणार?!) जास्त प्रसिद्ध आहेत. यांच्याकडील शाकाहारी स्पेश्यालिटीज पण एकसे एक असतात, बरं का.



मासे, मटण व चिकन चे एकापेक्षा एक सरस, ताजे, गरमा गरम, चविष्ट मिळण्याचे खूप स्टाँल्स इथे आहेत. जोडीला सूप, भाकरी, पँटीस, सोलकढी, व आईसक्रीम चे सुध्दा अनेक स्टाँल्स. अंडर वन रूफ.



दिवसभर चालू असणारे (१ वा २ तासच बंद असणारे) हे फेस्टिवल परवा पर्यंत चालू आहे.

अवश्य भेट द्या. आवर्जून खादाडखाऊंना बरोबर घेऊन जा.



आजच जाऊन आलो. मनसोक्त आडवा हात मारून आलो. मासे व मटण हापसले.



खाण्यासाठी जन्म आपूला...

---

मिलिंद काळे, 14th January 2016

Thursday, January 14, 2016

Er Rational musings #324

Er Rational musings #324



दारू सोडली आणि माझं आयुष्यच बदललं. आँ? होय, होय, बरोबर वाचताय सगळेजणं. दारू 'सोडल्यामुळे' लाईफ बदललं. लोकांची दारू 'धरल्यामुळे' लाईफ बदलतं, असा समज आहे, नाँर्मली; पण माझे कायमच भलतच काहीतरी; ऐकावे ते नवलच!!



पण मित्रांनो, खरच सांगतो. माझी अत्यंत लाडकी गोष्ट म्हणजे दारू. प्रचंड, मनापासून प्रेम केलं (अजूनही करतो!) मी तिच्यावर, व त्यामुळेच 'वाया' नाही गेलो. व्हिस्की, रम, व्होडका, जीन, बियर ह्या सगळ्यांवर माझे समसमान प्रेम. आलटून पालटून मूड, माहोल व मेहफि़ल बघून काय प्यायचे हे ठरवायचे. आणि विविध मेक् पाहीजेत. एका ब्रँडवर अडकून नाही रहायचे.

ब्लेंडर्स प्राइड असो वा राँयल स्टँग, स्मरनाँफ असो वा अल्काझार, फोस्टर्स असो वा किंग फिशर वा कुठलीही जीन असो, (पण रम म्हणजे फक्त ओल्ड माँक!) सगळा स्टाँक असायचा, अजूनही घरी आहे, व बाहेरही समसमान प्रेमाने आवडीने आलटून पालटून सगळ्याची चव एन्जाँय करायची, मनापासून.

अचानकपणे डोक्यात आलं, बंद करूया, कायमची. एवढी जीवाभावाची साथी मी ठरवून १ जानेवारी २०१५ पासून सोडून दिली. चक्क. Just like that.



विदाऊट गिव्हींग एनी पूर्वकल्पना, पूर्वसूचना, वन शाँट कट!



तरी बरेच हितचिंतक म्हणायचे



# करून सरून भागलास आणि देवपूजेला लागलास!

# एवढे अती कशाला करायचं?

# डाँक्टर ने सांगीतलं असेल.

# फक्त एक किंवा दोनच घे रे!

# नो हार्ड! बियर तरी घे!

# निदान मुंबई बाहेर तरी?!

# ओकेजनली तरी घे!

# तत्सम.....



मी सांगायचो, अरे बाबांनो असलं काहीही नाही; फक्त व फक्त मला वाटलं म्हणून.



नंतरही व आत्ताही मी पूर्वीच्याच उत्साहाने पार्ट्या अँरेंज करतो, दारू पाजतो, नुसता बसतो व नंतर स्वत:च्या गाडीने मित्रांना घरीही सोडतो. पूर्वीप्रमाणेच सर्व, एक्सेप्ट माझे स्वत:चे पीणे.



पण, पण काय सांगू मित्रांनो, त्या दिवसापासून टेपर्ड वे ने माझी व्यावसायिक कामे कमी झाली. एक गोष्ट सरळ होईना. साला कामे कमी झालीयेत हे खरेच आहे. बऱ्याच चर्वीचर्वण व अँनालेसिस व कारणे शोध मोहीमेनंतर मला सकृतदर्शनी अँडव्हर्स कारण काही सापडत नाहीये.



अेक्सेप्ट माझ्या लाडक्या सखीला अचानकपणे अन-सेरेमोनियसली धुडकारण्याचा परिणाम व तीने उगवलेला सूड. खरच सांगतो, अक्षरश: गांx मारली गेलीये!!



I am, therefore, resolving hereby that, I'll wait till 31st March 2016 for the situation to change for the better (end of the Financial Year).

Thereafter, there would be no other option left to me, except to turn back to my very old but faithful aide for life.



Cheers...

---

मिलिंद काळे, 15th January 2016

Er Rational musings #322

Er Rational musings #322



मुंबापूरी मधली मराठी माणसे फारच इंटरेस्टिंग होती व आहेत. मराठी पाँकेटस् होती व आहेत ती प्रामुख्याने गिरगाव, गिरणगाव (लालबाग परळ चिंचपोकळी करीरोड अभ्यूदय नगर काळा चौकी सहकार नगर), हिंदू काँलनी, दादर शिवाजी पार्क कँडल रोड माटुंगा रोड माहिम, मच्छीमार काँलनी, विलेपार्ले, गोरेगाव, बोरीवली, आणि ईस्टर्न सबर्बज मधे फक्त मुलुंड!



प्रत्येक भागातल्या मराठी लोक्स च्या आवडी निवडी, रिती रिवाज चाली, खाद्य संस्कृती, आर्थिक परिस्थिति, पोशाख, बोली, स्वभाव, प्रकृती, नोकरी व्यवसाय, वागणे बोलणे, इव्हन दिसणे वगैरे इतके भिन्न होते आहेत की काही विचारू नका.



गिरगावातला मराठी टक्का कमी होतोय झालाय हे वास्तव आहे. उरलेले लोक्स संस्कृति जपून आहेत. गिरणगाव तसे बघितले तर लोअर परेल व अप्पर वरली (वरळी!) ह्या स्थित्यंतराचे साक्षीदार कळत नकळत भागीदार आहे. दादर, शिवाजी पार्क मात्र टिकून आहे. येथील लोक्स कालानुसार सधनता मेंटेन करून आहेत. पार्ले खरेखूरे सच्चे सांस्कृतिक! गोरेगाव बोरीवली मध्य, उच्च मध्यमवर्गीय लोक्स नी व्यापलेलं, जून्या नव्याचं उत्तम मिश्रण आहे.



फेमस मिटिंग जाँईंटस् म्हणजे गिरगावातील फडके गणपती मंदिर, गिरगावातील चाळी व चाळींतल्या गल्या नाके, शिवाजी पार्क परिसर, पार्ल्याचे पणशीकर जंक्शन, गोरेगावातील वाड्या, बोरीवलीचा वझीरा नाका एरीया, ते आपल्या मुलुंडचे संभाजी मैदान, देशमुख उद्यान, गोडबोले चहा दूकान, बंटी चहा हाँटेल, आझाद चहा नाका, नीलम नगर नाका चहा टपरी, गव्हाणपाडा बस स्टाँप चहा स्टाँल, त्याचबरोबर पूर्वेची शिवसेना शाखा ते महाराष्ट्र सेवा संघ ते मुलुंड जिमखाना इ इ.



ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या शहरांतील मराठी वस्ती अशीच लक्षणीय व तशीच वैविध्यपूर्ण.



ठाणे हे अनेक बाबतीत पूण्याशी साधर्म्य राखून आहे. डोंबीवली बद्दल काय बोलावं? डोंबीवली फास्ट व डोंबीवली रिटर्न, पांढरपेशे सुशिक्षित. कल्याणचे मराठी जन जरा हटकेच, मी म्हणजे कोणीतरी, जरा गर्विष्ठ शिष्ठत्वा कडे झुकलेले की काय इतबर शंका यावी! अंबरनाथ बदलापूर पसरलेले व सिटी तून मायग्रेट झालेल्यांचे म्हणता येईल.



मुलुंडची ओळख उपनगरांचा राजा विथ वेल प्लँन्ड नगर रचना अशीच करता येईल, येते.

थोर इतिहासकार सेतू माधवराव पगडी ते दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे, उद्योगपती भाऊसाहेब केळकर ते अभिनेत्री निशिगंधा वाड, संगीत संयोजक अशोक हांडे ते कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, लेखक भा ल महाबळ ते संस्कृत पं प्रभाकर भातखंडे, चित्रकार यशवंत शिरवाडकर ते क्रिकेटपटूअजिंक्य रहाणे, लेखिका डाँ विजया वाड ते कवी अरूण म्हात्रे, महाराष्ट्र सेवा संघाचे प्रणेते सु ल गद्रे ते महाराष्ट्र सेवा संघाचे प्रथम आजन्म सभासद, १९४६ साली मुलुंडला येऊन स्थाईक झालेले माझे आजोबा कै वासुदेव रामचंद्र काळे वगैरे.



अगदी लेखक दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई ते xxx xx.



You know what I mean...

---

मिलिंद काळे, 14th January 2016

Er Rational musings #323

Er Rational musings #323



Mistakes do happen. And that is possible ONLY when one is TRYING n DOING something. Nothing is possible in IDLENESS. Not even mistakes, let alone achievements.



The REAL beauty lies ahead. What's done when one UNDERSTANDS his mistakes.



~ Something went WRONG. Something is AMISS.

~ ACKNOWLEDGE that you have made a MISTAKE. You have ERRED.

~ UNDERSTAND your MISTAKE, your FAULT.

~ DIAGNOSE and ANALYSE.

~ STUDY and find SOLUTIONS and weigh the OPTIONS.

~ ACT.

~ And act DECISIVELY.

~ Keep a tab, so that you DON’T make same MISTAKE twice.



NOTHING is lost. You can @lways REBOOT.



And even IMPOSSIBLE has POSSIBLE in it...

---

मिलिंद काळे, 14th January 2016

Wednesday, January 13, 2016

Er Rational musings #321

Er Rational musings #321



पतंग उडवण्याच्या असंख्य आठवणी आहेत.

अँक्च्यूअली पतंग 'उडवायचा' नसतो तर 'बदवायचा' असतो!

'तो' पतंग बर का, 'ती' पतंग नव्हे. जसे 'ते पेन', 'तो' पेन नव्हे; 'तो' कँच, 'ती' कँच नव्हे! असो.



पतंग, मांजा व फिरकी ही आम्हा पोरा टोरांची आयुधं. तिसऱ्या वाडीत (घरापासून तिसरी बिल्डिंग, ज्याला अर्ध प्रायव्हेट मैदान होतं, त्याला आम्ही तिसरी वाडी म्हणायचो. ह्या तिसऱ्या वाडीतल्या विहिरीत आम्हा सर्व मराठी लोक्स कडील गणपतींचे विसर्जन व्हायचे; असो, तिसऱ्या वाडीबद्दल नंतर कधीतरी).



तर ही तिसरी वाडी म्हणजे पतंग उडवायची जागा. कित्येक वेळा आम्ही बाबा पदमसिंह ग्राऊंड वा सोनार बांगला येथेही जमायचो.



पतंग विकत आणला की त्याला कणी बांधायची हे एक विशिष्ट टेक्नीक ची बाब होती. पतंगाला मांजा बांधायला, वरच्या बाजूला काडीच्या क्राँसमध्ये आवडनावड भोकं पाडायला लागायची, पण खरी गंमत खालच्या बाजूला मांजा कूठे बांधायचा ही होती. खालून अडीच, तीन, चार वगैरे बोटं सोडून भोकं पाडून मांजाला गाठी मारायच्या की झाली कणी तैयार. फिरकी सैल सोडून मांजाला दोन तीन चार वेळा विशिष्ट प्रकारे झटके द्यायचे. त्याचवेळी पतंग गिरक्या घेत उंच उडवायचा. मध्येच सेंटर आँफ ग्रँव्हिटीने सरळ झाला की आणखी आणखीनच झटके देत देत ऊंचच ऊंच बदवायचा. दूसऱ्या पतंगाच्या जवळ जाऊन हूल द्यायची. खाली वर, डावीकडे ऊजवीकडे, तिरका वर इ कसरती एक्स्पर्टली करायचो आम्ही. दूसरा पतंग काटायचा हे एकच ध्येय असायचे. काटायच्या दोन पध्दती होत्या, म्हणजे खालून वर वा वरून खाली. हा फारच स्किलचा खेळ होता. दूसऱ्याचा पतंग काटला की तो पकडायला धावाधाव व्हायची. ज्याचा पहिला हात लागेल त्याचा तो काटलेला पतंग. बऱ्याचदा हमरातुमरी व्हायची. मग काही वेळा मांडवली करायचो, म्हणजे पतंग एकाचा व त्याला लटकलेला मांजा दूसऱ्याचा. केव्हढा तो आनंद! पकडलेला मांजा आपल्या मांज्याला जोडायचा. पकडलेल्या पतंगाला आपला मांजा लावून बदवायचा.



व्हाँट अ टीम गेम. आलटून पालटून फिरकीपण पकडायची. लहान भावंडांना वा इतर लहानग्यांना आकाशातल्या पतंगांचा कंट्रोल द्यायचा, पब्लिक खूश. कित्ती तास आयुष्याचे पतंग उडवण्यात गेलेत ना?!



क्वचित आमच्या रामकूंज च्या गच्चीवर जायची परवानगी मिळायची, मग काय, उंच, उंच...

----

मिलिंद काळे, 13th January 2016

Tuesday, January 12, 2016

Er Rational musings #320

Er Rational musings #320



Children are future. Next-generation is the next thing. The In thing.



Parents always aspire for the child's well being. In every aspect. They see to it that the hardships which they have gone through, their children should not. Children should grow. All round growth, is what is seeked. Parents leave no stone unturned in upbringing. Naturally.



The next gen of today also receprocates well. They are aware of this.



One gravest virtue today's children have is complete (well, mostly!) absence of family feuds. The parents have witnessed bitter family skirmishes in their 'younghood'. And have suffered. Clashes, mostly because of money. Money is the root of all evil?!



Yes, it was. Not now. Let's hope, not now. On the contrary. Money is to be 'earned', rightly! To be 'used',  judiciously. To be 'displayed', proudly. To be 'spent', wisely. Why NOT?



Our next-generation understands this well. They want all. They are sincere. They will toil for it. And they will achieve! Surely!



Oh, whatever...

---

मिलिंद काळे, 12th January 2016

Er Rational musings #319

Er Rational musings #319



कानातलं, गळ्यातलं हे समस्त महिलांचे परवलीचे प्रचलित शब्द आहेत. आणि हे मोस्टली रस्त्यावर वा प्रदर्शनात वा दूकानातून विकत घेताना.

डूल/हार न म्हणता सगळ्या बायका असंच म्हणतात.

पायातलं/हातातलं/नाकातलं/दंडातलं/बोटातलं/केसातलं/कंबरेतलं (हुश्श) वगैरेना स्पेसिफिक नावानेच संबोधतात.

बरं, रस्त्यावर कानातलं गळ्यातलं स्वस्त मिळतं, प्रचंड व्हरायटी असते. नखशिखांत 'मँचिंग' च्या आवडीमुळे प्रत्येकीकडे शेकडोंन्नी कानातली गळ्यातली असावीत!



आणि बायकांच्या छान स्वच्छ सुंदर रहाण्याला, लोक्स 'नटणं' असं का म्हणतात? हातातली पर्स, पिशवी,बँग ते छत्री ते जवळचा मोबाईल ते पायातल्या चपला, सँडल्स इ ची रंगसंगती मिळती जूळती, उठून दिसणारी असावी असंच ह्यांना वाटलं व तश्याच त्या 'सजल्या' तर गैर काय?



लाल, हिरवे, पिवळे इ काय पुरूषांनी वापरायचे रंग आहेत का! कोणी पुरूष स्लिव्हलेस लाल रंगाचा शर्ट व पिवळी पँट घालून जर आँफिसला गेला तर? आहे का समाजाची मानसिकता? अती पूर्व काळी मातृसत्ताक पध्दत होती असे संशोधनाने सिध्द होतय. पण हा पेहेरावातला फरक कधी पासून व का पडला, कुठे सुरू झाला, कसा जगभर पसरला, कोणी पाडला, ह्यावर लिमिटेड, बहुतेक शून्य माहिती अँव्हेलेबल आहे.



काहीही असो, जागतिक बाजारपेठ मात्र 'स्त्री प्रधान' आहे हे निर्विवाद...

---

मिलिंद काळे, 12th January 2016

Er Rational musings #318

Er Rational musings #318



The struggle is worth it. Endurance testing to the full. The onus to be borne. Last straw on a camel's back, no, it's really an exhilarating experience of being able to carry so much. Solo. Alone by choice. A day is not far when Chintamani will repent, but by then, it would have been too late. And, mind you, THAT will be his greatest loss; and he will realise it, Manohar explained the rationale behind his actions, to Beena.

- a Compulsive Blander

Er Rational musings #317

Er Rational musings #317



ससा तो ससा की कापूस जसा

त्याने कासवाशी पैज लाविली

वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ

ही शर्यत रे अपुली



चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले

नि कासवाने अंग हलविले

ससा जाई पुढे नि झाडामागे दडे

ते कासवाने हळू पाहियले

वाटेत थांबले ना, कोणाशी बोलले ना

चालले लुटूलुटू पाही ससा



हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे

हे पाहुनिया ससा हरखला

खाई गार चारा, घे फांदीचा निवारा

तो हळूहळू तेथे पेंगुळला

मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे

झाडाच्या सावलीत झोपे ससा



झाली सांज वेळ तो गेला किती काळ

नि शहारली गवताची पाती

ससा झाला जागा, तो उगा करी त्रागा

नि धाव घेई डोंगराच्या माथी

कासवा तेथे पाही, ओशाळा मनी होई

निजला तो संपला, सांगे ससा



गीतकार : शांताराम नांदगावकर ,

गायक : उषा मंगेशकर,

संगीतकार : अरुण पौडवाल



लाघवी बोल व लयबध्द चाल व लोभस शब्द व लडिवाळ संगीतसाज.



आपण हे ऐकत ऐकतच मोठे झालोय ना?



अर्थ अनेक, जसे



~ थांबला तो संपला

~ गर्वाचे घर खाली

~ जो जीता वो ही सिकंदर

~ दूसऱ्याला कमी लेखू नका



And

Slow and steady wins the race...

---

मिलिंद काळे, 10th January 2016

Saturday, January 9, 2016

Er Rational musings #316

Er Rational musings #316



Perception is very important. The outer layer attracts many people. Due to ageing, the surface peels off. And the inner soul is bared. This could be good, bad or even ugly. It's this interior hue attracts and repels external forces like people, for instance.

Even if good is displayed, certain sect of friends choose to ignore. For them outer shine is more important. Moreover, for them your usefulness is considered finished. There is no benefit to them. Mostly monetary. You don't fit into their scheme of events.



erception is very important. The outer layer attracts many people. Due to ageing, the surface peels off. And the inner soul is bared. This could be good, bad or even ugly. It's this interior hue attracts and repels external forces like people, for instance.

Even if good is displayed, certain sect of friends choose to ignore. For them outer shine is more important. Moreover, for them your usefulness is considered finished. There is no benefit to them. Mostly monetary. You don't fit into their scheme of events. Use and throw. It's the motto of modern times. And the balance of win win is lost. This kinda seemingly mutually cordial relations are mostly artificial, in the first place.

You were unable to see that. See thru the veil. For you it's demigod interactions.

True colours of 'Benetton' sorry 'friendetron'!!!

---

मिलिंद काळे, 10th January 2016

Er Rational musings #315

Er Rational musings #315



एक अकेला इस शहर में, रात में और दोपहर में

आब-ओ-दाना ढूँढता है, आशियाना ढूँढता हैं



दिन खाली खाली बर्तन है, और रात है जैसे अंधा कुवां

इन सूनी अंधेरी आखों में, आँसू की जगह आता है धुंआ

जीने की वजह तो कोई नहीं, मरने का बहाना ढूँढता है



इन उम्र से लंबी सडकों को, मंजिल पे पहुचते देखा नहीं

बस दौड़ती, फिरती रहती है, हम ने तो ठहरते देखा नहीं

इस अजनबी से शहर में, जाना पहचाना ढूँढता है



गीतकार : गुलज़ार,

गायक : भूपेंद्र,

संगीतकार : जयदेव,

चित्रपट : घरोंदा (१९७७)



व्हाँट अ साँग! धीर गंभीर घोगरा घन स्वर!

सिनेमाच्या अडीच तासांच अंतर साताठ मिनिटांत कापणारं व कँनव्हास उलगडणारं काव्य!

मुंबई, माया नगरी. मोहमयी 'माया'वी नगरी.

तुमच्या माझ्या सारखा साधा सरळ मध्यमवर्गीय तरूण.

आँफीस मधलीच साधी सरळ मध्यमवर्गीय तरूणी.

घरच्या जबाबदाऱ्या, मित्रांनी एकत्र छोट्याश्या जागेत रहाणं, लग्न तर करायचय मग रहायला वेगळं स्वत:च्या मालकीचे घर (घरटं) नको?

त्याकरताचा हा शोध, हा प्रवास. हा प्लाँट.

अतिशय मन लावून काम केलय यात अमोल पालेकर (सूदीप) व झरीना वहाबने (छाया).

अव्याहत अविरत वहाणारी मुंबई. रस्ते व लोकल ट्रेन्स. चौपाटी दर्शन. आशयघन सेंटर थीम चे गीत. बेहतरीन. कहानी में ट्विस्ट भी हैं

सदतीस अडतीस वर्षांपूर्वी च्या परिस्थितित व आत्ताच्या यंग कपल्स च्या घरासंबंधी च्या स्वप्नात, केलेल्या धडपडीत, काहीच फरक नाहीये ना?



माझ्या लाडक्या मुंबईत माझे स्वतःचे, नव्हे, आम्हा दोघांचे, छोटेसे का होईना, पण स्वप्नवत स्वर्गवत घरकुल...

---

मिलिंद काळे, 9th January 2016

Excerpts from "a Compulsive Blander"



...and therefore, though it's true that responsibility without authority is a slanderous festoon; many a times, authority without responsibility amounts to spurious insignia.

You see, I can not accept it anymore! I refuse to be a pawn on this game of chess. Played between multiple players. Every player inter-replacing the other, as per the whims and fancies of Chintamani. Ironically, this could be the best way out, for both of us, said Manohar.



To be contd...

---

Milind Kale, 9th January 2016

Thursday, January 7, 2016

Er Rational musings #313

Er Rational musings #313



राग, लोभ, मत्सर, प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, मैत्री, वैर, दूष्मनी, भांडण, तंटा, बखेडा, तिरस्कार, तिटकारा, इच्छा, अपेक्षा, ईर्षां, आवड, नावड, तेढ, बंधूभाव, सोय, जवळीक, दूरावा, माज, मग्रूरी, मान-पान, मानापमान, अहंकार, गर्व, अभिमान, द्वेष इ इ इ.



सगळ्याचे कूळ आणि मूळ, फक्त पैसा, पैसा व पैसा.

---

मिलिंद काळे, 7th January 2016

Wednesday, January 6, 2016

Prosody, syzygy n synergy

Er Rational musings #311



मित्र.

~ जवळचा, लांबचा

~ लहानपणापासूनचा, शाळेतला, काँलेजमधला, घराजवळचा, आँफीस मधला, ग्राऊंडवरचा, जिमखान्यातला, क्लबमधला, सगळी गूपीतं माहीती असलेला, ट्रेन मधला, नाक्यावरचा, बारमधला, काँमन छंद/नाद/आवड असलेला, कोणत्याही वेळी फोन करावा व कोणत्याही वेळी हक्काने भेटू शकणारा...



माणसे.

~ चांगली माणसं, वाईट माणसं

~ हेकेखोर माणसं, आपमतलबी माणसं

~ वाट पाहणारी माणसं, वाट लावणारी माणसं

~ वाट समजावणारी माणसं, वाट 'दाखवणारी' माणसं

~ मदतीला तत्पर माणसं, टाळणारी माणसं

~ हाकेला धावणारी माणसं, हवीहवीशी माणसं

~ भावनाप्रधान माणसं, व्यवहारी माणसं

~ प्रेमळ माणसं, दुर्मिळ माणसं...



हितचिंतक.

~ व्हाँट्सअँप, फेसबूक मधली कधीही प्रत्यक्ष न भेटलेले, चीअर करणारे, थम्स अप अंगठा व तत्सम स्माईलीज वापरून कनेक्ट होणारे...



When brighter sides of @ll three line up in a straight line, it's a 'prosody' or 'syzygy' of a kind, culminating into a perfect 'synergy', else...

---

मिलिंद काळे, 6th January 2016

सूर तेच छेडीता...

Er Rational musings #310



सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे

आज लाभले सखी, सौख्य जे मला हवे



अबोल प्रीत बहरली, कळी हळूच उमलली वेदना सुखावली, हासली तुझ्यासवे



एकटा तरी स्मृती, तुझ्याच या सभोवती

बोललो कसे किती, शब्द शब्द आठवे



गीतकार : मधुसूदन कालेलकर,

गायक : महेंद्र कपूर,

संगीतकार : एन. दत्ता,

चित्रपट : अपराध (१९६९)



अ क्लासिक गीत. सुंदर पिक्चरायझेशन.

चक्क, रमेश देव, सीमा व इंद्राणी मुखर्जी!



या गीतात पियानोचा केलेला वापर केवळ अप्रतिम. रमेश देव हे गाणे म्हणतोय व स्पूल्सवाल्या टेप रेकाँर्डर ने रेकाँर्ड करतोय. हा एक भाग. दूसऱ्या वेळी हेच गाणं बारशाच्या वेळी ऐकवलं जातं, सुरेख.



तिघांच्या चेहेऱ्यावरील क्लोज अपस् असो किंवा रमेशची न दिसणारी, पण पियानोवर फिरणारी बोटे असो वा त्याचा हलकेच एकट्याचाच पाच सहा स्टेप्स चा डान्स असो वा स्वत:भोवतीची गिरकी - एकदा क्लाँकवाईज, एकदा अँटी क्लाँकवाईज (!) असो किंवा इंद्राणीने हळूच सीमाचा घेतलेला पापा असो, व्वा, क्या बात हैं.



बाळावर स्थिरावणारा कँमेरा, मधून मधून, रमेशने रेकाँर्ड केलेल्या भूतकाळात घेवून जातो. सीमाची काळी साडी वर्सेस इंद्राणीची काळी साडी, काँट्रास्ट, कथेबरहुकूम!



हळूवार प्रीतीची दुर्मिळ झलक...

---

मिलिंद काळे, 6th January 2016

Sunday, January 3, 2016

A face without pain, fear or guilt...

Er Rational musings #309



परिचीत, माहितीतला, ओळखीचा, मित्र, मित्राचा मित्र, मित्राच्या माहितीतला, मित्राच्या ओळखीचा, मित्राचा रेफरन्स, जवळचा नातेवाईक, लांबचा नातेवाईक, नातेवाईकाच्या माहितीतला, नातेवाईकाच्या ओळखीचा, नातेवाईकाचा रेफरन्स, वैयक्तिक संबंधित, व्यावसायिक संबंधित, अनोळखी.



माणसे, समाज, कुटुंब, परिवार, एकंदरीत व्यवस्था! परस्पर संबंध, घटना, व प्रसंग.



इंटरेस्टिंग विषय आहे. विश्लेषण वा चिरफाड करायची म्हटली तर मजेदार, गमतीशीर, भलताच, चांगला, वाईट, कठोर, छान, आवडता नावडता, निष्कर्ष निघतोय ना? पण ते तेव्हढ्यापूरतं त्याच्या अनुषंगाने; एक वास्तव समोर येतं ना? आणि वास्तव हे फक्त वास्तव च असतं.



A statement of facts. Pure, raw and naked.



How you face upto it, matters.



Face it with 'a face without pain, fear or guilt'...



कर्मणयेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।

---

मिलिंद काळे, 3rd January 2016

Social media and we.

Er Rational musings #308



Manners n Etiquettes of Social networking:



There would be hundreds of contacts in our personal mail. These people are present in other mediums of socialising, like Whatsapp n Facebook etc.



With respect to time and ease of response, eMail was a close contact. Facebook is closer still but Whatsapp is closest.



Deal, interact, communicate with each of them, accordingly. Segregate your mail contacts. Filter them, to have either a Facebook or Whatsapp connect. Or both. Or none, offcourse.



Keep a distance. Have a cut off line. A clear cut demarcation. Fix the priorities of accessing. Customize the amount of time spent n amount of personal shared information. Top most and ONLY reason to be on social media, should be of extremely selfish nature. Social networking is ONLY for our self development, pleasure n joy. Nothing else. You don't owe anything to anyone, as the connect is of mutual consent. And respect. The privacy, I mean, Accept it but don't Submit for.



And now be ready for instant, direct video cell calls; now...

---

मिलिंद काळे, 3rd January 2016

Friday, January 1, 2016

मामलेदार मिसळ...

Er Rational musings #307



छत्तीस वर्षे, एकच जागा, एकच माणूस..

अरे दचकू नका. हे वर्णन आहे माझं व मामलेदार मिसळीचं!



दोन तिख्खट मिसळी, पाच (!) पाव व एक तिखट रस्सा. वर्षानूवर्ष, अव्याहत.



घटनाक्रम/खायची पध्दत (recommended)

~ आत जायचे. शक्यतो आपल्या उजव्या हाताला भिंत किंवा aisle येईल असे बसायचे. (म्हणजे खाताना हात दूसऱ्याला लागत नाही, मोकळा राहतो, आखडून खावं लागत नाही). आर्डर द्यायची एक तिखट. मोबाईल बंद करायचा (चे). खाताना डिस्टर्बंस नको, आणि काही जगबूडी होत नाही! फूल्ल बाह्यांचा शर्ट असेल तर दंडापर्यंत दूमडायचा, उजव्या हाताचा. रूमाल काढायचा व व्यवस्थित मांडीवर पसरायचा. नाऊ यू आर रेडी फाँर द मिसळ.



आता मिसळ येईल. त्या बशीत दोन चमच्यांन्नी मिसळ नीट कालवायची. सावकाश, हे स्किल आहे, न सांडता. खाली एक छोटासा साधारण चौकोनी आकाराचा बटाटा असतो. तो एका चमच्यात घेऊन दूसऱ्या चमच्याने स्किलफूली त्याचे लहान तूकडे करायचे व छान मिक्स करायचे. आता डाव्या हातात पाव पकडून, लचके घेत घेत, एक तूकडा पावाचा व एक चमचा मिसळीचा, असं चूपचाप, न बोलता फस्त करायचे. (खाताना, माझ्यासारखी तूम्ही पण दाद देवू शकता. एखाद्या सूरेल गायनाला रसिक श्रोते जशी दाद देतात, तसेच माझे चालू असते - हातवारे.) एक मिसळ संपल्यावर दूसरी मागवायची. दूसरी मिड वे खाऊन संपली की एक तिख्खट रस्सा मागवून ओतायचा. ह्यावेळी मिसळी बरोबरचे दोन पाव संपवून एक (पाचवा) पाव एक्स्ट्रा मागवायचा. आता मात्र पाव उजव्या हातात घेवून तूकडे मिसळीत बूचकळून तिखटजार मिश्रणात लडबडून चाटून पुसून मिसळ स्वच्छ करायची!



पहिली मिसळ संपल्यावर एक व दूसरी संपल्यावर अजून एक ग्लास असे पाणी प्यायचे. बिल सांगायचे. शर्ट फोल्ड केलेला सरळ करायचा. बिल पे करायचे. बाहेर यायचे. वाँश बेसीन बाहेर आहे, तिथे तोंड धुवायचे. मोबाईल चालू करायचा (चे) व मार्गस्थ व्हायचे. माझ्यासारखे तोंडातल्या तोंडात पुटपुटत, शिव्या देत, छ्या म्हणत, श्शी म्हणत वगैरे वगैरे (माझी कौतूक करण्याची पध्दत आहे हो!).



पूढे परत यायचा वायदा करत.



काय चव आहे. अख्या जगातली सर्वश्रेष्ठ मिसळ! Impossible, श्शी, च्या** घो, आय**ली, छ्या...

---

मिलिंद काळे, 2nd January 2016

विट्ठल विट्ठल

धन्य वेणूनाद अनुक्षेत्र पाळा

सुवर्णाची कमळे वनमाला गळा

राई रखुमाबाई राणी या सगळा

ओवाळिती राजा विठोबा सावळा



जयदेव जयदेव जय पांडुरंगा...

Er Rational musings #306

Er Rational musings #306



There is an unwritten rule in Bridge (card game). It says that 'when in doubt, play trumps'. द्विधा मनस्थिति असेल, तर हुकूमाचे पान खेळा.



It's also true, whenever there are two options, available to you. Equally tempting, available, but you are unsure about with whom to go with. कुणाच्या पारड्यात वजन टाकायचं?



In such a situation, always go with the first. Which you have dealt with first. Which you have liked it first. Which you have loved it first. It's the 'trumps' in such cases, and the hand is rarely lost.



किंवा मग 'ना घर का ना घाट का' अशी (ही) अवस्था होवू शकते.



And it may so happen that you may regret it for the rest of your life...



When in doubt, play trumps! @lways...

---

मिलिंद काळे, 1st January 2016

Fear of extinction...

Er Rational musings #305



Coming years are going to be of almost actual virtual reality. Networking. Technology. Speed. E-dealings all. And of oversmart phones.



Whole plethora of The World, literally at fingertips. A gentle tap on corning gorilla glass. In fraction of a second. With 4G-5G, nano technology.



We have to be updated all the time. On our toes. Alert. Eyes n Ears open. And yes, Nose, also; to smell a rat, in time!



Else, a chance of being left behind. Fear of extinction. Brace up...

---

मिलिंद काळे, 1st January 2016