Saturday, October 31, 2015

Er Rational musings #72

Er Rational musings #72



अति हुशार माणसे जरा व्हिम्झीकल - सर्किट असतात.



हां, आता अती हुशार (हुश्शार नव्हे) कोण?, हा एक वादाचा - संशोघनाचा विषय आहे.



अँकँडमिक प्रावीण्य मिळवलेले लोक्स, कुशाग्र - तल्लख बुध्दि जन्मजात असलेले लोक्स, स्व:कष्टाने प्राप्त केलेला किंवा आपल्या अक्कलहुशारीने वाढवलेला पैसा - श्रीमंती गाठलेले लोक्स, बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात (!) असलेले लोक्स, का खरेखूरे सटकी/सणकी/चक्रम/कधी काय करतील-बोलतील याची गँरेंटी नसलेले लोक्स?!!



अशा लोक्स (!) च्या बरोबर काम करायचं किंवा अशा लोक्स (!) च्या बरोबर डिल करणं हे एक वेगळेच स्किल आहे!



~ म्हणलं तर मजा, म्हटलं तर सजा आहे.

~ काही वेळा जुलमाचा रामराम आहे.

~ थोडी खुशी थोडा गम (दु:ख वा गोंद! पण) आहे.

~ धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं, आहे.



सारांश काय तर - एक अपरिहार्य, व आविभाज्य घटक आहे!!

---

मिलिंद काळे, 1st November 2015

No comments:

Post a Comment