Er Rational musings #66
एखाद्या संस्थेचे मोठेपण किंवा खूजेपण अधोरेखीत होते ते काही महत्वाच्या गोष्टींमूळे, जसे...
~ संस्थेचे काम
~ संस्था स्थापन करणारी वा करणार्या व्यक्ति
~ संस्थेचे मूळ उद्दिष्ट
~ सर्वसामान्यांचा सहभाग
~ लोकेशन, व्याप्ती, प्रसिद्धी, वगैरे वगैरे
परंतू अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे, संस्था चालवणारी माणसे/कार्यकर्ते, त्यांची निष्ठा व पारदर्शकता!
काही जून्या संस्था चालवणारी कार्यकारी मंडळं मात्र आपली खाजगी मालकी असल्या प्रमाणे कारभार करतात, हे बघून अतीव दु:ख व वेदना होतात. वर्षानूवर्ष जागा अडवायच्या, मिरवायचं व नवीन मासे गळाला लावायचे. म्हणजे काम करणारी माणसे तयार करायची, गोड बोलायचे, वरकरणी उदारमतवादी असल्याचे सोंग करायचे, व कार्यभाग साध्य झाला की कामापूरता मामा, टाटा, सी यू, बाय बाय, ठेंगा!
ह्या घट्ट चिकटलेल्या मंडळींना प्रचंड भीती वाटते - अरे, आपल्या अढळपदाला धक्का बसला तर!? मग सुरू असते तू छान, मी छान ची स्पर्धा, एक क्लोज्ड सर्कल, अभेद्य, एक कौतूक ग्रूप, पण संस्थेच्या प्रगतीला मारक.
अत्यंत किळसवाणी गोष्ट म्हणजे, अशा संस्थांचे कँटरर (मोनोपोली वाले), वर्षातून एकदोनदा सर्व सभासदांना जेवण खायला घालून, आपणच मालक असल्याच्या आविर्भावात वावरत असतात!
कोण बोलणार, काय करणार, कुणाला सांगणार आणि कुठे कसं बदलणार.
अळी मिळी गुप चिळी; हाताची घडी, तोंडावर बोट व डोळ्यावर पट्टी!!
चालुद्या.
---
मिलिंद काळे, 28th October 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment