Er Rational musings #47
...दिवसापेक्षा तीला रात्रच आवडायची. एकदा का दिवेलागण झाली की तिला आपसूकच हायसं वाटायच.
चढत्या सूर्यकिरणांसोबत नवी आव्हाने उभी ठाकायची. एकातून सोडवणूक होतीये न होतीये तोपर्यंत दूसरं संकट आ वासून पूढे उभे!
कधी संपणार ही दररोजची परवड. का बरे माझ्याच बाबतीत ही क्रूर नियती कठोर वागतीये? मीच असं कोणाचं वाईट चिंतलय?! कधीच नाही. मग का? का? प्रश्न, प्रश्न, अनुत्तरित!
संध्याकाळ सरता काळोखात तिला आश्वस्त वाटायचं. स्वगत म्हणायची, हुश्श! आता मी माझी आणि माझी मी, माझीच मी...
---
मिलिंद काळे, 10th October 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment