Er Rational musings #53
जूने दोन तीन किस्से आठवतायत.
1985-86 च्या सुमारास मी BEST मध्ये नोकरी करत होतो.
भायखळ्याच्या साबूसिद्दिक मधले मित्र, आँफीस मेट्रो जवळ, हाँटेल एम्पायर मधले मित्र, ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीची मेंबरशिप, पूढचा अभ्यास (!), ओव्हल सिनेमाचे ओव्हल रेस्टाँरंट, कँफे राँयल, इंग्लिश पिक्चर, असंख्य ईराणी हाँटेल्स, समुद्र किनारा व पूर्ण साऊथ मुंबईत मुक्त संचार यामुळे दिवसेंदिवस मुलुंडला घरी येणेच 2-3 दिवसांनी व्हायला लागले. मग काय, मी व अतुलने चक्क गिरगावात ताराबागेत दोन खोल्यांचे घर ओळखीत भाड्याने घेतले.
~ समोरच दरयश बेकरी. किती तरी वेळा तिथे जाऊन रात्री च्या 2-3 वाजता गरम गरम पाव (हो, नुसताच पाव) खाल्लेत.
~ दरवेळेस बेस्ट बसने नागपाड्याहून गिरगावात पोहोचलो, बस स्टाँप आला की म्हणायचो, "गायवाडी वाले बैल", उतरा!
~ गिरगाव चौपाटी वर एक "फ्लोटीला" नावाचे हाँटेल होते, बिर्ला केंद्राला लागून. तिथे काही वेळा शर्ट, लुंगी व खाली बूट घालून (!!) बियर प्यायलेली आहे! रात्री 11-11.30 वाजता. ताराबागेतून जाऊन, हुक्की आली म्हणून. (हे हाँटेल unauthorized होते व BMC ने नंतर ते जमीनदोस्त केले)
~ नागपाडा - भायखळ्याच्या काँलेज मधून आम्ही चालत (!) ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीत, नरीमन पाँईंट पर्यंत, चालत जात असू - पुस्तकं बदलायला - घ्यायला!!
~ नागपाड्याच्या एका हाँटेलचे काही वेळा तरी बुडवलेले पैसे....
मोडस आँपरेंडी बघा-
दोघे तिघे पहिले जाऊन बसले की एक दोन डिश - भजी, वडा, उपमा वगैरे - मागवून संपवता संपवता आणखी एक, किंवा एकदम एक दोघे यायचे - परत काहीतरी खायला प्यायला - सगळा ग्रूप जमला की मग बिल, एक नव्हे दोन तीन बिलं मागवायचो, हे मी देणार - हे तू दे असे वेटर समोर करत - मग त्या बिलाची शाई कुठल्या रंगाची आहे - निळं का काळं, कमी अमाउंटचं पूर्वीचं असंच चूकवलेलं, ढापलेलं, पाकीटात अशी विविध बिलं असायची - तसंच दिसणारं, बिल देऊन आम्ही बाहेर. म्हणजे खर्या खुर्या तीन चार बिलांऐवजी दोन तीन कमी अमाउंटची बिलं (बिलावर तारीख वा इतर काही, लिहीत नसत ते वेटर - हाँटेल ही तसेच) Full2TP! कित्ती भंकस करावी!
~ बन मस्का वा ब्रून मस्का, पानी कम चाय, नाश्ता, आठ आणे वा काही ठिकाणी एक रूपया ज्यूक बाँक्स मध्ये टाकून ऐकत बसलेली गाणी, तासन् तास व चहा वर चहा रिचवत एम्पायरला मित्रांबरोबर केलेला टाईमपास, क्षुधा शांती/टेंबे/वीरकर/माधवाश्रम येथील जेवण...
कायपण...
A MEMOIR
---
मिलिंद काळे, 11th October 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment