Friday, October 30, 2015

Er Rational musings #69

Er Rational musings #69



छत्रपती शिवाजी महाराज.



ह्या शब्दांत काय ताकद आहे. कुणाच्याही अंगावर रोमांच नाही उठले असे केवळ अशक्य. "की जय" असं आपसूकच तोंडावर नाही आले तरच नवल.



आतापर्यंत अनेक बिरूदावलींनी महाराजांना संबोधण्यात आलय, गौरवण्यात आलय व यापूढेही होत राहील. तरीही शब्द कमीच पडतील.



मला एकच माहितीये. की ते होते, होऊन गेले, म्हणून मी, आपण आहोत.



त्यांचे शिवचरित्र, त्यांचे विचार, त्यांची साहसी वृत्ती, धडाडी, दूरद्रृष्टी, व्यवहार चातुर्य, गनिमी कावा, निश्चय, निर्धार, संयम, करारी बाणा, मुत्सद्देगिरी, सर्वसमावेशक - समसमान न्याय, चेहेऱ्यावरील तेज - करडी नजर - डोळे (!), कर्तव्य कठोर पण प्रसंगानुरूप मृदू स्वभाव, युद्ध कौशल्य, त्यांनी बांधलेले गड-किल्ले, त्यांचे आरमार, आई जगदंबेपाशी - माता जिजाऊपाशी असलेली निष्ठा, त्यांची भवानी तलवार, त्यांचे मावळे,.,.,,..



निश्चयाचा महामेरू ||

बहुत जनासी आधारू ||

अखंड स्थितीचा निर्धारू ||

श्रीमंत योगी ||



यासम हा, एकमेवाद्वितीय.



🙏 नतमस्तक 🙏



🚩 मानाचा मुजरा 🚩

---

मिलिंद काळे, 30th October 2015

No comments:

Post a Comment