Er Rational musings #67
पुण्याची हवा अाजही आल्हाददायक म्हणता येईल. पूढचे 2-3 महिने तर मस्तच असणारेत. हिरवी थंडी! (नेहमी गुलाबी च का म्हणायचे?!)
आऊटडोअर रेस्टाँरंट मध्ये बसून छानसे डिनर, अर्थातच अपेयपाना बरोबरीन (अर्थातच मी सोडून इतरांचे, कारण आता बंद बंद बंद!) अहाहा, तीन चार वेळचं तरी प्लँनिंग झालय. एखादा बार्बेक्यू चा प्रोग्राम करता आला तर सोने पे सुहागा. बघूया कसे काय जमतेय ते. काही छोट्या ट्रिप्स पण पाईपलाईन मध्ये आहेत.
प्लस मुलुंडला सालाबाद प्रमाणे यंदाही 31स्ट डिसेंबर आहेच की! भरगच्च प्रोग्राम.
गेल्या 30-32 वर्षातली पहिलीच 31st डिसेंबर असेल की ती स्व कोरडी जाणार.
काहीच प्राँब्लेम नाही. मित्रमंडळी असणारच आहेत व माझ्याकडचा स्टाँक वाटच बघतोय.
दाने दाने पे लिखा हैं खाने वाले का नाम और बूंद बूंद पे लिखा हैं पिने वाले (वालों) का नाम.
डिसीजन इज अ डिसीजन इज अ डिसीजन! (पिरीयड)
---
मिलिंद काळे, 29th October 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment