Er Rational musings #55
आज सकाळी बँकेत गेलो होतो. तमाम महिलावर्ग निळ्या रंगात! साडी निळी, ब्लाऊज मँचिंग निळा, ड्रेस नीळे इ. नंतर लक्षात आले, अरे हो - "आजचा रंग निळा" असे एका वर्तमानपत्राने छापलेय व गेली काही वर्ष समस्त भगिनी तंतोतंत पालन करताहेत! बरं वर आमिष काय तर ग्रूप फोटो छापला जायची शक्यता.
मी जरा तपास केला माहीतगारांकडून की बाबा धर्मात/शास्त्रात असे स्पेसिफीक रंग सांगितलेत का? उत्तर नाही असं आहे.
म्हणजे झालय काय, एखाद्या वृत्तपत्राने खप वाढवण्यासाठी हे केलय का? दूसर्या एका रायव्हल वृत्तपत्राने नेमके उलट क्रमांकाने रंग सांगितले तर? कसलं कामाला लावलय बायकांना...
बरं, गम्मत काय आहे, की मराठी सोडून इतरभाषिक स्त्रियांना हे माहीतही नसते. (हा, आता आँफीस मधल्या सोडून!)
असो.
कुठलाही रंग वापरा ओ, देवी काही कोपणार नाही, व नाराज ही होणार नाही!
---
मिलिंद काळे, 14th October 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment