Friday, October 9, 2015

Er Rational musings #46

Er Rational musings #46



...तिने आर्त स्वरात आक्रोश केला. आकाशाकडे आशाळभूत नजर भिरभिरत असता, आत्यंतिक ओढीने, एक शेवटचा वायफळ प्रयत्न करून बघितला. परंतु नाही; देव काही तिला बधला नाही.



नशीब नशीब जे म्हणतात ते हेच असावे. प्राक्तनातील भोग आहेत हे.



अत्यंत प्रतिकूल परिस्थितिंशी सामना करता करता, तिची आधीच चांगलीच दमछाक झालेली होती. ती अगदीच मेटाकूटीला आली होती. दरएक पायरी पार करताना झालेल्या यातना व वेदना आधीच तिला असह्य होत होत्या. आणी हा भीषण प्रसंग!



देवदूत येतो का? जीवनातले कठीण फासे बदलता येतात का? चमत्कार शक्य असतो का? अतिंद्रिय शक्ती अस्तित्वात असतात का?



कुठल्याच प्रश्नांची उक्तरे तीला काही सापडली नाहीत. अनाकलनीय असावीत बहुतेक!



अपरिहार्य, असहाय्य अबला... की असेही चार हात करणारी सबला?



अंतिम विजय सत्याचाच! श्रध्दा, सबूरीचा! मन, मनगट व मेंदूचा! निष्ठेचा! अतुलनीय धैर्याचा!



मानाचा मुजरा...

---

मिलिंद काळे, 9th October 2015

No comments:

Post a Comment