Saturday, October 10, 2015

Er Rational musings #48

Er Rational musings #48



असं घेताय का तसं घेताय



म्हणलं तर सोप्प, म्हणलं तर कठीण

म्हणलं तर साधं सरळ, म्हणलं तर जटील

म्हणलं तर मज्जा, म्हणलं तर सजा

म्हणलं तर गमजा, म्हणलं तर फज्जा



असं बघताय का तसं बघताय



म्हणलं तर दिव्यांचा लखलखाट

म्हणलं तर वीजांचा कडकडाट

म्हणलं तर लाल सोनेरी अंगार

म्हणलं तर काळाकुट्ट अंधार



असं वागताय का तसं वागताय



म्हणलं तर छानछौकी

म्हणलं तर दुनियादारी

म्हणलं तर उडवाउडवी

म्हणलं तर जबाबदारी



असं म्हणताय का तसं म्हणताय



म्हणलं तर "मला काय त्याचे" ही वृत्ती

म्हणलं तर "माझीच चूक सुधारतो" ही कृती

म्हणलं तर निव्वळ निष्काळजी

म्हणलं तर भावनाप्रिय "देवाक काळजी"!!

---

मिलिंद काळे, 10th October 2015

No comments:

Post a Comment