Saturday, August 22, 2015

Er Rational notations #6

Er Rational notations #6



काल रात्री 'डबलसीट' बघीतला. हलकाफुलका आहे, जरूर बघा.



लालबाग, परळ च्या छोट्या मोठ्या चाळीत रहाणार्या दोन तीन पिढ्या, त्यांचे शेजार, मित्र, नौकरी व्यवसाय, चाकरमानी, छोटे मोठे कौंटुंबिक सामाजिक प्रसंग, घटना, त्यांचे रहाटगाडगे या सर्वांचे उत्क्रुष्ट व्यक्तिचित्रण, द्रूष्यचित्रण व सादरीकरण परीणामकारक व अभिनंदनास पात्र!



विषय साधा, सरधोपट असाच म्हणता येईल, आजही, अनेक वर्षांनंतरही, सर्वांच्या - प्रत्येक मुंबईकराच्या नसानसातला - मनामनातला - स्वत:चे घर!



ह्यावर पुष्कळ नाटकं सिनेमे आजवर येऊन गेले - नितांतसुंदर घरौदा ते खोसला का घोसला ते लालबाग परळ पर्यंत. सगळेच ह्या विषयाला स्पर्श करून गेलेत मार्मिक पणे, मनाला आनंद देऊन गेलेत.



डबलसीट मध्ये ओझरतेच पण लाघवी मुंबई दर्शन आहे; मुंबई बाहेरील लोकांच्या मनातल्या शंका / कुतुहल आहे; आणि म्हणतात ना जगण्याची धडपड आहे; स्वप्नं आहेत; आणि हो, ते मुंबईचे स्पिरिट का काय म्हणतात ना ते पण आहे!



चपखल पात्र रचना, संयत अभिनय, लॉजिकल घटनाक्रम, छोटे छोटे कट शॉट सीन्स, मंजूळ - जरूरी पुरतेच पार्श्व संगीत, रियलिस्टिक केशभूषा - वेषभूषा, सुरूवात, मध्य व शेवट पर्यंत पेललेला - अन् सांभाळलेला, नसलेला मेलोड्रामा (इमोशनल ब्लॉक मेल टाळलेलंय), छानसा आवडेल / पटेल असा सुखांत! एक नवीन उल्लेखनीय बाब म्हणजे मोबाईल रिएलिटी - व्हॉट्सऍप - एसेमेस चा दाखवलेला / खुबीने केलेला वापर!



लोअर परेल ते अप्पर वरळी (!) असं होत असलेलं, नव्हे झालेलं ट्रान्सफाओर्मेशन!



दिल ढूंढता हैं....दो दिवाने शहर में....



आवर्जून बघा.

---

मिलिंद काळे, 23rd August 2015

No comments:

Post a Comment