Er Rational musings #6
दारू हे जगातील एकमेव सत्य आहे.
दारू पिणं ही एक कला आहे. आणि दारू म्हणाल तर एक अत्यंत आनंददायी गोष्ट. मन, शारीर, प्रसन्न करणारं, उत्साह आणणारं, नवीन गोष्टी शिकवणारं, नवीन मित्र जोडणारं, जुनी मैत्री चाळवणारं, जागवणारं, सुख दु:खात साथ देणारं, कधीही न फसवणारं, असं हे एकमेवाद्वितीय अद्भूत रसायन - मादक पेय!
ती कशीही प्यायली तरी तिची महती (!) कमी होत नाही. एकट्याने प्यावी किंवा ग्रूप मध्ये प्यावी. अपनी अपनी सोच, अपना अपना अंदाज, अपनी अपनी पसंद!
आयडियली, रिमझिम पाऊस किंवा शिडकावा, मंद धूंद थंडी, बएकग्राऊंडला आवडती गाणी, आवडती कंपनी, गरम गरम चिकन, सुकं मटण, माश्याची तुकडी, उकडलेली अंडी, चीज, खारे शेगदाणेे, रोस्टेड/तळलेले पोह्याचे पापड, अशी बैठक जमवून दारूचा आस्वाद घ्यावा.
दारूकडे, दारू पिणार्यांकडे जरा सकारात्मक, वेगळ्या द्रूष्टीकोनातून बघितले पाहीजे. खास करून कधीही दारू न प्यायलेल्यांनी.
सरसकट दारू वाईट नाही. अर्थात फर्स्ट हैंड अनुभव चांगला नसेल तरच. पण होतय काय, गंमत बघा, की अक्षरश: रस्त्यांवर पडलेल्या बेवड्यांकडे बघून, बाकीच्या ऐकीव व बघीव (!) माहीती वरून, (माझ्या बहीणीच्या दिरा शेजारी राहणार्या काकांचा जावई कसला दारूडा आहे, चांगल्या संसाराची वाट लावली, या व तत्सम उदाहरणांवरून) दारू पिणे किती वाईट्ट, असे तुच्छतेने म्हणले जाते व दारू चवीचवीने एन्जॉय करणार्यालाही एकाच तराजूत तोलले जाते.
ही मानसिकता बदलावी लागेल. प्रत्येकाने एकदातरी, काहीतरी म्हणजे बियर, वाईन, शैंपेन, व्हिस्की, रम, जीन, व्होडका वगैरे पिऊन बघा रे. विदाऊट एनी प्रिजुडीस्ड माईंड; निषिध्द न समजता, अन-बायस्ड ओपिनियन द्या. आधी करा, मग बोला! नाहीतर बोलू नका ओ!
का, आपल्याला (ही) आवडेल अशी भिती (शंका) तर वाटत नाहीना?!
---
मिलिंद काळे, 19th August 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment