Monday, September 26, 2016

Er Rational musings #729

Er Rational musings #729



बहुतकरून सकाळी मुलुंड जिमखाना वारी ठरलेली. एखादं वाहन काढून. घरच्या चहां नंतर. नऊसव्वानौ पर्यंत परत. आणि मग आँफीस दिंडी.



हा सकाळचा घराबाहेरचा एकदीड तास अत्यंत महत्वाचा असतोय ठरतोय. आवडता खेळ, आवडतं ठिकाण, आवडती माणसं, व आवडता (अनेकवचनी) चहा. आणि सध्याच चालू केलेलं, आवडतं काम, जा ये करता करता.



रिक्शावाले सुस्साट सैराट असतात या वेळेला. सिग्नल वगैरे मस्त फाx वर मारतात. नवतरूण(णी) दूचाकीवजा विमान चालवत असतात. चारचाकी बेदरकार, व पादचारी निर्विकार.



अशावेळी अधेमधेआडवातिडवा कोणीतरी लुडबुडतोच. शांत रहाणे, न चिडफडणे, आँल इज वेल म्हणणे, चक्क थांबणे अशा घूसखोरांसाठी, वाट करून देणे अशा अतिक्रमणाऱ्यांसाठी, आणि पहले आप पहले आप असे करणे तंद्रीस्त निर्दीस्त वाटसरूंसाठी; जाबाबा असच म्हणणे, कूल ली आपला रस्ता पकडणं - हे सर्व कँन जू वंन्डर्स फाँर रेस्ट आँफ द डे.



बघा, करून बघा. दिवस चांगला जातो - स्वानुभव.



शूभसकाळ, सुदिवस सर्वांना...

---

मिलिंद काळे, २७ सप्टेंम्बर २०१६

No comments:

Post a Comment