Friday, September 2, 2016

Er Rational musings #695

Er Rational musings #695



"कोणी पैसेच देत नाही. बील मागच्या आँक्टोबर मध्ये टाकलय. महिन्याभरात वर्ष पूर्ण होईल. ही सध्या दूसरी आँर्डर एक्झीक्यूट करतोय. काय करणार? बर, माज तर किती ह्यांना; दररोज येऊन ड्राँईंग चेंज करतायत. ह्या अँडिशनल कामाची अँमेंडमेंट काढणार कधी, आणि बील चेक व सर्टिफाय करणार कधी?"



माझा एक काँन्ट्रँक्टर मित्र सांगत होता, नव्हे,तो सुटलाच आणि फूटलाच.



"अरे फाँलो अप करतोयस ना? पैसे बिसे पाहीजे असतील".



"नाही रे; पण हज्जार चेंन्जेस सांगतात करायला. बरं, रूबाब तो काय? पेमेंट चं नाव नाही. हराxखोx".



हा आहे सध्याचा बिझिनेस मधला काँमन डायलाँग वजा संभाषण. अर्थ एकच; क्लायंट त्याच्या स्वत:च्या आजपावेतो झालेल्या व चालणाऱ्या कामांचे पैसेच देत नाही. *देतच नाही* असं म्हणणं जास्त योग्य. बरं, यात सब गधेघोडे बारा टक्का. लहान कंपनी असो वा एखादी नामवंत. उल्टं, जेव्हढी कंपनी / क्लायंट मोठा, तेव्हढी नाटकं जास्त.



धंद्यात 'लक्ष्मण' नाही हेच खर...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२ सप्टेंम्बर २०१६

No comments:

Post a Comment