Friday, September 9, 2016

Er Rational musings #704

Er Rational musings #704



सध्या साँल्लिड भाव वधारलाय अस्मादीकांचा. हाय आँडस् आहेत. डिमांड प्रचंड वाढलीये. माझ्यासारख्या पार्टी अँनिमलला आमंत्रणं, बोलावणी खूप. ट्रेमेंन्डस्.



दोन वर्षांपासून दारूकाम बंदय हो, कायमचच बंद केलय! असच आपलं, काहीही स्पेसिफिक कारण नाही. कोण सांगणार, आणि मी कोणाच ऐकणार! बोंबला. पण पार्ट्या मात्र तश्याच चालू च आहेत, असतात. त्याच उत्साहात, पहिल्या सारखाच सर्व पूढाकार, जूळवाजमव, अँरेंन्जमेंट, प्लँनिंग इत्यादि. बर, आतातर दारू नाही. कोल्ड ड्रिंक मला आवडत नाही; ज्यूस वगैरे मी पीत नाही; आईसक्रीम माझा प्रांत नव्हे. जनरली बार व रेस्तराँत माझा लाडका चहा मिळत नाही. त्यामूळे ७ / ८ कप ढोसायचा प्रश्नच उद्भवत नाही. क्वचित एखादं सूपबिप, तेही वन बाय टू वेग्रे. चकणा संपवत बसत नाही, सिगारेट, मावा, तंबाखू पान नाही, टिपीकल पूणेरी टीटीएमएम (तूझे तू माझे मी) नाही, तर अस्सल अस्खलित(!) मुंबईकर, इक्वल काँन्ट्रीब्यूशन (सोल्जर्स!) देणारा ...अरे काय काय हे?! नाँन ड्रिंकर, स्वत:ची गाडी आणून, प्रत्येकाला आपापल्या घरी ड्राँप करत करत, लास्टला घरी जाणारा...केव्हढं मोठ्ठ *अँसेट* आहे ना??!! हक्काचा हमखास, माणूस.



काहीजणं तरी, कधीमधी उपटसुंभासारखे विचारतात, "का रे? सोडलीयस ना? मग अटेंन्ड कसकाय करतोस?" बरेच न पिणारे जनरली येत नाहीत, काही कारणं काढून टाळतात पार्ट्या. त्यामुळे हा प्रश्नशंका बरोबर आहे, अनुभवच तसा असतो ना.



माझं सिंपल सरळ लाँजिक आहे. एकतर भेटी कमी होत चालल्यात, नानाविध कारणांमुळे. त्यातनं जर ठरवता येतीय पार्टी, भेटताहेत मंडळी, तर दारू आँर नो दारू, दँटस् इम्मटेरियल, धावतच गेलं पाहीजे, सगळं बाजूला सारून. एकत्र 'बसणे', व बोलणे, थट्टागप्पा मस्करी, खाणे शेअरींग, इ इ. सत्कारणी वेळ क्षण. आणि आयुष्यभराच्या सा-आठवणी, पुंजावळी.



हे म्हणजे 'पार्टी विथ अ डिफरन्स', नाही का?...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

९ सप्टेंम्बर २०१६

No comments:

Post a Comment