Thursday, September 1, 2016

Er Rational musings #693

Er Rational musings #693



दूचाकी, मोटार सायकल, बाईक वा अँक्टीव्हा सदृश स्कूटर



~ हाँर्न वाजवला, ५ पाँईंट कमी. (बाब्या, हाँर्न इज फाँर इमर्जंन्सी. उठसुट हाँर्न बडवायला, तो काय ढोलबाजा थोडीच आहे? चक्रम!)



~ सिग्नल ला थांबलेला असताना, डाव्या पायातला गियर टाकून, डावा पाय फूट रेस्ट वर ठेवून, ऊजवा पाय जमिनीवर टेकवून, सिग्नल हिरवा होण्याची वाट बघत उभा असणारा दूचाकीस्वार, ५० पाँईंट कमी. (मूर्खांनो, नवशिक्यांनो - म्हणजे आयुष्यात कधीही बजाज - अँपी वगैरे उजव्या पायाशी ब्रेक असलेल्या स्कूटर्स न चालवलेले लोक्स, उजव्या पायाने आत्ताचाही उजव्या बाजूता पायाचा ब्रेक कंन्ट्रोल करा रे - ब्रेक वरचा पाय हटवू नका; तसेही, उजवा पाय खाली ठेवून उभे राहणे म्हणजे ट्रँफिक साईडचा पाय - कोण खाली ठेवावा का?) (पाठी बसणारा उजव्या साईडने बसतो का कधी? अक्कल नाही!



~ सिग्नल ला वा तशीही, दूचाकी स्लो करताना वा थांबवत असताना, ऊजवा पाय जमिनीवर टेकवण्यासाठी, ब्रेकवरून उचलून खाली आला, (आधी, डाव्या पाया ऐवजी) ७५ पाँईंट कमी. (वरीलप्रमाणे. अक्कलशून्य!)



~ उजवीडावी कडे वळताना सिग्नल नाही दिला, १५ पाँईंट कमी. (तुला जे काय हवं ते कर बाब्यो, तू स्वयंभू मनमानी चालक आहेस; रस्ता तूझ्या बाxचा च आहे. कुठेही वळव, कुठेही थांबव; फक्त पाठच्याला, आजूबाजूच्याला, समोरच्याला कळू दे, तुला काय करायतय ते! बिनडोक!)



~ दूचाकी रस्त्याच्या अल्मोस्ट मध्य भागातनं चालवणे (एक्स्ट्रीम लेफ्ट सोडून) २५ पाँईंट कमी. (बाब्या, आपली दूचाकीची लेन म्हणजे एक्स्ट्रीम लेफ्ट असते. मधनं हलकी वाहने भरधाव धावत असतात. आणि अँटलीस्ट एव्हढी तरी लेफ्ट लेन ने चालव, की कुणीही चारचाकी वरून तुझ्या डावीकडून तुला ओव्हरटेक नाही करणार - म्हणजे तेव्हढी जागा डावीकडे नाही पाहीजे - तुझ्या उजवीकडूनच तूला पाठच्या वाहनाने ओव्हरटेक केले पाहीजे. अक्कलकमी!)



~ आरसे नसणे (काढून ठेवलेले असतात - लाज वाटते बहुतेक) २५ पाँईंट कमी. (बाब्या, पाठची वाहनं दिसायला आरसे असताते; तुझ्याच फायद्यासाठी. स्टाईलभाई!)



~ आरसे असले तरीही, नमस्कार केल्यासदृश एकमेकांकडे तोंड करून असणे. २५ पाँईंट कमी. (वरीलप्रमाणे. स्टाईलभाई एक नंबर)



~ दोन्ही हातांनी, पंजांनी, फक्त हँन्डलच न पकडता, दोन, तीन वा चार बोटे उघडून, ती बोटे, समोर, डाव्या बाजूला क्लचवर व उजव्या बाजूला पूढच्या ब्रेकवर ठेवणे (मोटार सायकल साठी) व दोन्ही हातांची बोटे उघडून, सैल करून पूढे समोर, दोन्ही ब्रेक्स वर अलगद रेस्ट करणे (कधी कोण मध्ये येतय व कधी मी ब्रेक्स मारतोय, अशी वाट बघत) २५ पाँईंट कमी. (पूर्ण ग्रीप पाहीजे; काय गार्डन मध्ये फिरतोय का? मूर्ख!)



~ सिग्नल पास होताना, थोडे शेवटी शेवटी म्हणजे हिरव्याचा लाल होताना क्राँस करताना हेड लाईट लावून, अप्पर डिप्पर चा फ्लँशींग सिग्नल न देणे. २५ पाँईंट कमी. (बाब्या, इथे पाहीजे जातीचे. येऱ्यागबाळ्याचे काम नोहे!)



~ अगदीच इमर्जंन्सी मध्ये, वा पूढे रस्ता बंद अलेल, वा अँक्सीडेंन्ट झाला असेल, तर राँन्ग साईडने, उलटी, दूचाकी आणणं अपरिहार्य असतं. अशावेळी हेडलाईट चालू न ठेवणं. २५ पाँईंट कमी. अशावेळी स्पीड मिनिमम नसणं. ५० पाँईंट कमी. (एकतर उलटा येतोयेस, त्यातनं माजमिजास; दीडशहाणा!)



~ सिटीतल्या सिटीत फिरताना, ह्हे असे एकदम रेज करणं दूचाकी, एकदम ५०, वा ७० चा स्पीड घेणं, मग दोनतीन मिनिटातच, घाजघूज करून ब्रेक मारणं; अचानक रेज अचानक ब्रेक मारत दूचाकी चालवण. २५ पाँईंट कमी. (काय त्या गाडीची वाट, इंजिनावर अत्याचार बलात्कार; अक्कल गुडङ्यात!)



~ दूचाकी पार्क करताना, आडवी उभी तिरकी नीटपणे पार्क न करणं; अजून एखादी दूचाकी लावायला जागा न सोडणं. २५ पाँईंट कमी. (दूसऱ्याचाही विचार कररे; निष्काळजी!)



~ बाकी असलच, स्टँन्ड वर घ्यायला विसरणं, हेडलाईट वा लेफ्टराईट सिग्नल लाईट आँन च ठेवणं - बंद करायला विसरणं, लेन कटींग, सिग्नल जंपींग, नो एन्ट्री घूसींग, राँन्ग साईड चालवींग, ट्रिपल सीट, अन् काय न् कसलं काय. 🔟 पाँईंट कमी. (काय कप्पाळ बोलणार!)



असं दिसतय, की माझ्या निकषांवर, किती दूचाकीजन उरणार तरणार??!!



'कार'नाम्यां बद्दल लवकरच...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

२ सप्टेंम्बर २०१६

No comments:

Post a Comment