Er Rational musings #699
येणार येणार येणार, आले आले आले, ओहss गेले गेले, गेले! झाले बहू होतील बहू पण यांसम हा.
नेहमीच अस वाटतं, की गणपती बाप्पा इतका व गणपती बाप्पा सारखा, प्रेमळ हवहवासा लाडका देवबाप्पा दूसरा नाहीये. हक्काने काहीकाहीही सांगावं मागावं बोलावं. ह्हेच सगळे जशेच्यातशे ऐकण्यासाठीच ह्हे मोठ्ठाले कान, व ह्हेच सगळे जशेच्यातशे बघण्यासाठीच ह्हे मोठ्ठाले डोळे, आणि ह्हेच सगळे जशेच्यातशे पचवण्यासाठीच ह्हे मोठ्ठाले पोट.
दरवर्षी प्रत्यक्ष दीडेक दिवसांसाठी मिटींग साठी येतो. मग स्वागत समारंभ, मिटींग रूम वा काँन्फरन्स रूम मध्ये मुक्काम. जेमतेम पाच तासांचा ब्रेक, रात्री बारा ते पाच विश्रांती; भेटीगाठी खाणेपिणे, निरनिराळ्या लोक्स बरोबर संवाद, त्या भक्तांची पाँवर पाँईंट प्रेझेंटेशन्स, यिअरली बजेट सँन्क्शनिंग व अँलाँकेशन अंडर व्हेरियस हेडस्; गाऱ्हाणी, स्तुती, मागण्या, गुणगौरव, कौतुक सोहळे, नमस्कार चमत्कार भेटीगाठी ओळखी आठवणी, इत्यादि, केव्व्हढा भरगच्च कार्यक्रम रूपरेषा!
माझ्यासाठी मात्र, या वन टू वन मिटींग ने बरेचसे आँप्शन्स ओपन होतात. ब्रेनस्टाँर्मिंग सेशन्स कंटिन्यूअसली चालू असतात आत बाहेर करता सरता! मार्ग दिसतो सापडतो निघतो. दिशा मिळते. निर्णय होतात. भावी इव्हेंटस् लाईन अप होतात.
स्साँल्लीड भांडता पण येते याच्याबरोबर. तो बिचारा, गूड लिसनर ना, ऐकून घेतो निमूटपणे. त्याच्या मोहक चेहऱ्याकडे बघता बघताना जाणवते, की त्याची नजर आपल्यावर रोखलीये व डोळे आपल्या तोंडाकडे पेनिट्रेट करून सरळ मस्तिष्कापर्यंत पोचलेत व सत्यअसत्याची, आपल्या प्रामाणिक भावनेची, वेदनेची चिरफाड केली जातेय; आणि त्याची एकदाका खातरजमा झाली, की बास्स. तो सुखकर्ता दु:खहर्ता प्रेम देतो, कृपादृष्टी ठेवतो. भरभरून! अद्भुत आहे ना? आणि नीट विचार केला, तर कळतं, लाँजिकल पण!
खर म्हणजे अस आहे, की हा एव्हढा एकरूप होतो; आपण आपल्याशीच काही गोष्टी ठरवतो, त्यासाठी जिवापाड प्रयत्न करतो, व त्या बऱ्यापैकी पूर्णत्वास नेतो. आपसूक.
गणपती बाप्पा हा आद्य *फ्रेंन्ड, फिलाँसाँफर व गाईड* आहे, माझा.
ओ माय फ्रेन्ड गणेशाsss
तू रहना साथ हमेशाsss
---
मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
८ सप्टेंम्बर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment