Er Rational musings #709
मराठी भाषा लवचिक आहे, म्हणतात. वळवावी तशी वळते. परंतु/आणि तिच्या प्रत्येक रूपात ती अतिशय खुलते, नवेपण एकदम भावतं तिचं.
हे सध्याचे (ओव्हर)स्मार्ट फोन्स, आँटो टायपिंग, ते व्हाँईस टू कीबोर्ड, ते ह्हे एव्हढे अँप्स व नाना देवनागरी फाँन्टस्. माध्यमं खूप, पण प्रचलित चलतीची म्हणजे फेसबूक व व्हाँट्सअँप.
आणि काही काय, कित्येक अपभ्रंश; स्पेल्लिंग्ज टाईपायला (टाईप करायला) थोडी क्लिष्ट आहेत म्हणूनही:
"खऱ्याखुऱ्या" ऐवजी "खर्याखुर्या" इ इ. लिहीण, व पूढे जाणं. व ऱ्हस्व दीर्घ च्या टायपो मुळे, वा अशीही होणारी गोची, शब्द वाक्यं वाकप्रचार यांना वेगळच रूपड! या सगळ्या देवनागरी फाँन्टस् च्या, वा त्याकनं कस्टमाईज्ड केलेल्या गंमतीजमती.
उदाहरणार्थ:
'नाही' च्या ऐवजी 'नै'.
'हिंदीत' म्हणजे 'हिंडीत'.
'आन्देव' चा अर्थ 'आने दो'.
'णिशेध' हा 'निषेध'.
'निशेद' हा पण 'निषेध'.
'जल्ला' म्हणजे तर जळला.
'साप्रत' 'सापडत' ऐवजी.
'बै' म्हणजे 'बाई'.
'ज्जेबात' ये हैं 'ये बात'.
'लाईकायला' म्हणजे 'लाईक करायला'.
'कै च्या कै' म्हणजे 'काही च्या काही'.
'काँमेंटायला' म्हणजे 'काँमेंट करायला'.
'वेग्रे' म्हणजे 'वगैरे'.
'लोक्स' म्हणजे 'लोकं'.
कित्तीतरी...
कधीक्वचित अस वाटत, की हे असले भ्रंश, रूढले तर? नवीन पिढी, मुले, असच लिहायला लागले, खरं समजून, तर? काही सांगता येत नाही; लगेच पूढच्या नऊपंधरा वर्षांत नाही होणार कदाचित. पण होणारच नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल, नाही का?
तसेही, टँक्सी [भेटली], टँक्सी [मिळाली] च्या ऐवजी; हा इथवर प्रवास(!) बेमालूमपणे झालेलाच आहेना!!
ॐ फेसबूकाय नम:
ॐ व्हाँट्सअँपाय नम:
पर् मला नै वाटत की हिंडी असो वा आपली माय मर्राठी, कै च्या कै काँमेंन्टून काँमन लोक्स वेग्रे या नपभ्रंशांमुळे येणार्या संभ्याव्य धोक्यांचा णिशेध करतील. जल्ली मेली ईडा पीडा बै टळो! भाषेविरूद कोणी लाईकायला लागले, तर त्याचा तीव्र निशेद केल्याबगर आमच्यान् स्वसत बस्वणार नै. ज्जेबात!!
कधीकधी, 'ळ' नसतोय टायपायला; मग बर्याच (बऱ्याच, बरका!) वेळा लोक्स 'ल' लिहीतात. आता यामुळे मी कागदोपत्री काय मिलिंद "काळे" च्या ऐवजी मिलिंद "काले" होणाराय काय??!!
जान्दो (म्हणजे जाने दो!), भावना महत्वाची...
---
मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
१५ सप्टेंम्बर २०१६
(www.milindkale.com)
(milindmkale.blogspot.in)
-----
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment