Friday, September 9, 2016

Er Rational musings #702

Er Rational musings #702



"We do not comment on rumours and market speculations"...



असं जेव्हा एखाद्या कंपनीचा प्रवक्ता म्हणल्याचं किंवा



"Repeated eMails sent to xxx were futile, and remained un-answered"...



अस ''द टाईम्स आँफ इंडिया' वा 'इकाँनाँमिक टाईम्स' मध्ये छापून आलं एकदिवस, की ओळखावं, कंपनी मोठी आहे. चांगलीच मोठी झालीये.



मला खरोखरच या इंडस्ट्रीयलिस्टस्, आंन्त्रप्रेन्युअरस्, बिझीनेसमेन, व्यावसायिक, व्यापारी, प्रोफेशनल्स् वेग्रे लोकांच जाम कौतुक आहे. त्यातनं जर कोणी 'सेल्फ मेड' या (ब्राँड) कँटेगरीतला असला तर मला प्रचंड म्हणजे प्रचंडच कौतुक वाटतं, आणि प्रचंड म्हणजे प्रचंडच शतपटीने आदर वाढतो.



धंदा, व्यवसाय करणं, चालवणं, वाढवणं, हे खायचे काम नाही. सोलो शिप, प्रोप्रायटर शिप, पार्टनर शिप, प्रायव्हेट लिमिटेड वा लिमिटेड लायबिलिटी कंपनी, ते पब्लिक लिमिटेड कंपनी, इ चढता क्रम काहीजणं पार करतात; पण हे टप्पे गाठताना, प्रत्येकाचे निरनिराळे ठोकताळे, अंदाज असतात. भयंकर जिद्द, व धडाडीची ही माणसं. खुमखुमी असणारेही काही कमी नाहीयेत. आमच्याकडे असं तसं, ते माझ्याकडे असं तसं, ते परत आमच्याकडे असं तसं, हा त्यांच्या बोलण्यातला बदल ट्रान्झिशनचा भाग आहे.



अर्थातच, या गहन विषयावर खूप साहित्य, माहिती, अँव्हेलेबल आहे. अगदी, टक्के टोणपे, चाचपडणं, पडणं उठणं, कोणी तरी मसि़हा/गाँड फादर/हँन्ड होल्डर/बँकर मिळणं, वाईटचांगली माणसं, सहकारी, ते विविध अनुभव, त्यातनं उत्पन्न होणाऱ्या, आलेल्या संधी, ते, यश अपयश, सँटिस्फँक्शन, ते 'मी काय शिकलो', वगैरे वगैरे वर तर पीएचड्या करण्याइतपत मुबलक प्रमाणात घाऊक माहिती.



पण होत काय, की, प्रत्येक जण हे बाळकडू घेऊन वा घेत घेत जरी पूढे जात असला, तरी त्यातही काहीजणं निव्वळ धृव तारे आहेत माझ्यासाठी. त्यातनं, मराठी माणूस जर असेल तर, चार चाँद! व्वा, क्या बात हो.



माझी फिलींन्ग्ज ही Awe, Appreciate Admire, ते Respect ते All the Best, अशीच असतात.



काँन्ग्रँच्यूलेशन्स, अँन्ड कीप इट अप, आँल व्यावसायिक, व्यापारी व उद्योजक...

---

मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई

९ सप्टेंम्बर २०१६

No comments:

Post a Comment