Er Rational musings #703
पोलिसांवर होणारे वाढते, बिनधास्त हल्ले ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
~ स्थळ: मुलुंड पूर्व
देशमुख उद्यान परिसर, व खाद्य जत्रा गाड्या
वेळ: सरत्या संध्याकाळची.
प्रसंग: गस्ती पथक वाहन येते, थोडं पूढे कुठेतरी, वा बाजूआजूलाच थांबते. पूढे ड्रायव्हर व सहपोलिस, पाठच्या सीटवर एकजण. तो उतरतो, भेळपाणीपूरी वाल्याकडे जायची गरज नाही, भैय्याच जीपकडे येतो काय नकोहवं ते विचारतो, परत आपल्या गाडीवर, मग रिक्वीझीट पार्सल प्लँस्टीक पिशवीतन जीपमध्ये सुपूर्द करतो, परत येताना, जळफळत, शिव्या घालत, काहीनाहीते बडबडत पुटपुटत परत आपल्या कामाला लागतो.
हेच दृश्य थोड्याफार फरकाने, केळेवाल्याकडे, चहापान टपरीवर, वगैरे निदर्शनास येते तिथे आजूबाजूला!
~ स्थळ: मुलुंड पश्चिम
एलबीएस रोड, जाँन्सन अँन्ड जाँन्सन जंक्शन
फायर ब्रिगेड चा सिग्नल
वेळ: केव्हाही, कोणत्याही दिवशी
प्रसंग: आयुष्यात कधीही या इथे सिग्नल माँनिटर करताना चौकात ट्रँफीक पोलिस कोणी बघीतला नाही. कायमच दोनतीघे हवालदार दीडेक फर्लांग लांब साईडला उभे. लेफ्ट टर्न फ्री ठेवलेले नाहीयेत येथे. सिग्नल जंप करणं टेम्प्टींग; मग पूढे झडप, साईडला घेणं, वार्तालाप घासघीस, व 'दंड'वसूली! अविरत अव्याहत.
हेच दृश्य थोड्याफार फरकाने, पाच रस्ता जंक्शन, बाळराजेश्वर जंक्शन, चेकनाका, पी एन्ड टी जंक्शन, निर्मल जंक्शन, लिंक रोड जंक्शन वगैरे निदर्शनास येते जिकडेतिकडे तिथे आजूबाजूला!
~ स्थळ: समस्त मुलुंड पश्चिम
वेळ: बहुतेक वेळा, सकाळी दहा पर्यंत व संध्याकाळी साडेसात नंतर.
प्रसंग: दूचाकीवाहक पोलिस, विनाहेल्मेट
~ स्थळ: समस्त मुलुंड पूर्व
वेळ: बहुतेक वेळा, २४ तास
प्रसंग: दूचाकीवाहक पोलिस, विनाहेल्मेट आणि, दूचाकीपिलियन पोलिस, विनाहेल्मेट
~ स्थळ: समस्त मुलुंड पश्चिम व पूर्व
वेळ: बहुतेक वेळा, २४ तास.
प्रसंग: दूचाकीपिलियन पोलिस, विनाहेल्मेट आणि, चारचाकी गस्तपथक गाडी चालक व बाजूला बसलेला पोलिस, विना सीटबेल्ट
~ स्शळ, वेळ: आख्या मुंबईत, कुठेही बहुतकरून.
मुंबई बाहेरची शहरं व गावं, तर बघायलाच नको!
प्रसंग: फारथोड्या फरकाने सेम टू सेम.
धाक, वचक, दरारा, जरब, सहानुभूति, आदर, आस्था, प्रतिष्ठा,...आरारारा...गयी भैस पानी में।
यांची प्रतिमा मग्रूरी अरेरावी मनमानी, तर इतरांची भावना राग द्वेष मत्सर,...
मग इतर सर्व दुर्लक्षलेल्या गोष्टी: ताणतणाव, २४ तास अनियमित ड्यूटी, काहीही कामं, तुटपूंजा पगार, कमी रजा, राहत्या बकाल वस्त्या, (अ)सोयी-सुविधा-साधनं-स्वास्थ्य, हस्तक्षेप,...अाबाबाबा, गयी भैस पानी में।
कुठं थांबणार, कोण थांबवणार!
शेवटी, गयी भैस पानी में, हेच खरं...
---
मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
९ सप्टेंम्बर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment