Er Rational musings #712
विनाहेल्मेट दूचाकीपिलियन सवारी हा कायद्यानं गुन्हा आहे.
एक्सप्रेसवे, नँशनल हायवे (NH), स्टेट हायवे (SH), वेस्टर्न व ईस्टर्न हायवे, अशा, व इत्यादि तत्सम रस्त्यांवर(च) हेल्मेट सक्ती करावी; असा कायद्यात बदल का करू नये? जनसामान्यांची सोय नको का बघायला? अपघाताला निमंत्रण, विनाहेल्मेट वाल्यांच्या अपघात संख्येची आकडेवारी, वगैरे सगळ ठीकाय. माहीतीयाय.
एकच सिमिलर उदाहरण देतो.
~ कायद्यानं गुन्हा = आहे.
~ अपघाताला आमंत्रण = हमखास. कैक पटीने जास्त धोकादायक.
~ अपघातसंख्येची आकडेवारी = अनेक पट.
~ कायदा राबवणं, ह्यूमनली (प्रँक्टिकली) पाँसिबल पाँसिबल = नाही!
~ अटकाव, प्रतिबंध तरी करू शकतो का = नो!
~ कारण = अपरिहार्हता. १०० टक्के अपरिहार्हता.
हा आहे मुंबईतल्या लोकल ट्रेन्स मधला फूटबोर्ड वरचा प्रवास. बोली चालत्या भाषेत सांगायचं तर, लोकल ट्रेनच्या दारात उभं राहून (कैक वेळा लटकत) केलेला जीवघेणा प्रवास. हा (सुघ्दा) कायद्यानं गुन्हा आहे!!
हा दारात उभं रहावं लागून केलेला मूठ्ठीजीव प्रवास, असा नुसता कायद्यानं बंद करता येईल का? लोकांना काय माहित नसतं का, की हे म्हणजे निर्विवादपणे मृत्यूला आमंत्रण; अँटलीस्ट हातपाय वा डोकं फूटायला तरी? लोकल प्रवासी आहेत ना, का किडामुंगी? त्यांना काय हौस आहे जीव धोक्यात घालायची?
काहीही आपलं!
लोकांची सोय महत्वाची नाही का? आणि हे कणवेचे कठोर कायदेपालन वगैरे सोडा; साधं झेब्रा क्राँसिंग वर वाहन थांबवणं/उभं करणं हा कायद्यानं गुन्हा आहे ना? वाहनं उभी असतातच ना? करावीच लागतात ना? नाहीतर, सिग्नल वर रस्त्याच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत लाईन लागेल. चारी बाजूला, कारण जेमतेम तीन वाहनं पास होत नाहीत, तोवर सिग्नल बदलेल! आधीच, दूकानांच अतिक्रमण, मग बाहेर फेरीवाले, मग बाहेर वाहनं पार्क केलेली, मग बाहेर लोकं चालणार, मग उरलेल्या रस्त्यावरनं दोन्ही बाजूनी वाहनं धावणार. हाताबाहेर गेलीय ना परिस्थिति?! बरेचदा वाहतूक पोलिसच, ट्रँफीक बघून, वाहनांना पूढे पूढे येऊन थांबायला सांगतातच ना? ते जाऊदे, कित्येक ट्रँफीक जंक्शन वर झेब्रा काँसिंग चे पट्टे जिकडे संपतात, तिथेच ट्रँफीक आयलंड येतय पूढ्यात डेड एंन्ड प्रमाणे. (मुलुंडचं पाच रस्ता जंक्शन बघा...) असो.
कायदे आहेत, पाळलेच गेले पाहीजेत, दुमतच नाहीच. रिव्ह्यू बिव्ह्यू करायला नकोका पण? आऊटडेटेड, ब्रिटीशकालीन इर्रिलेव्हंन्ट हुडकून कालानुरूप बदलसोय हवी की नको?
नाहीतर पकडाकी उद्यापास्नं फूटबोर्डवाल्यांना स्यू साईसुट्ट्यो मोटो...
---
मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
१६ सप्टेंम्बर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment