Er Rational musings #789
सुप्रभात मित्रांनो.
असं घेताय का तसं घेताय...
म्हणलं तर सोप्प, म्हणलं तर कठीण
म्हणलं तर साधं सरळ, म्हणलं तर जटील
म्हणलं तर मज्जा, म्हणलं तर सजा
म्हणलं तर गमजा, म्हणलं तर फज्जा
असं बघताय का तसं बघताय...
म्हणलं तर दिव्यांचा लखलखाट
म्हणलं तर वीजांचा कडकडाट
म्हणलं तर लाल सोनेरी अंगार
म्हणलं तर काळाकुट्ट अंधार
असं वागताय का तसं वागताय...
म्हणलं तर छानछौकी
म्हणलं तर दुनियादारी
म्हणलं तर उडवाउडवी
म्हणलं तर जबाबदारी
असं म्हणताय का तसं म्हणताय...
म्हणलं तर "मला काय त्याचे" ही वृत्ती
म्हणलं तर "चूक सुधारतो" ही कृती
म्हणलं तर निव्वळ निष्काळजी
म्हणलं तर खुशालचेंडू "देवाक काळजी"!!
असं लिहीतोय, व तसं वाचताय...
दोन जणांच्या मध्ये सहा (इंग्रजी) आकडा ठेवला, तर तो, एकाला सहा वाटेलदिसेल, तर दूसऱ्याला नऊ! तसेच, दोन जणांच्या मध्ये सहा (मराठी) आकडा ठेवला, तर तो, एकाला सहा दिसेलवाटेल, तर दूसऱ्याला तीन!
सगळंच सापेक्ष असतय. आपला सुंदरसा दिवस सुरू होतोय, तर पृथ्वीच्या विरूद्ध बाजूवर काळोख *'उजाडतोय!'*
आपलं आज लक्ष्मीपूजन! लक्ष्मी चंचल असते म्हणतात. भगवती लक्ष्मीचे वाहन घुबड. ती जेव्हा एकटी येते तेव्हा उल्लू (घुबड = हिंदीमध्ये) बनवून निघून जाते. आणि जेव्हा ती भगवान विष्णुंबरोबर गरूडावरून येते, तेव्हा स्थिर राहते!
" मुकुंदी स्थिरावली लक्ष्मी जैसी ।।"
याच स्वर्गीय संपत्तीचा आपल्या कुटुंबियांसोबत सुखाने व योग्य उपभोग निरंतर चिरकाल घेता यावा, म्हणून आजचे लक्ष्मीपूजन.
भगवती लक्ष्मीपण सापेक्ष स्वर्गीय अाहे, असते, बर का?!! त्यामुळे मन:पूर्वक पूजा;
बाकी आहेच, देवी(!)क काळजी...
---
मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
३० आँक्टोबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment