Er Rational musings #761
सगळ करून झालं. Tried to reason with him. पण पालथ्या घड्यावर पाणी.
आपलं ये रे माझ्या मागल्या. गाढवापूढे वाचली गीता. कोळसा उगाळावा तेव्हढा काळाच. आणि, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच.
बरं, सगळ होऊन, गीरा तो भी टांग ऊपर।
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात
मुळातच शून्य, तरी शहाणपणा अंगात
नशीब बलवत्तर आणि कुलदैवत पाठी
तरीच मिरवतो शेखी, धरी सर्वां वेठी
पूर्वजांची पूण्याई वेळ मारून नेई
जरी खाऊन पिऊन सूखी, असमाधानच होई
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: काळा पाषाण
माजोर्डी वृत्ती, मिरवे प्रौढी, नाही हो सूजाण
कितीही आव आणो, भरूनी हवा शीडात
आगाऊपणा भारी, यांचे पाय पाळण्यातच दिसतात
जाऊ द्या, झाले गेले गंगेला मिळाले म्हणूयात
सोडून द्या, कारण यांची अक्कलच आहे गुडघ्यात!
क्वचित एखादा निपजतो भेटतो, असा, दिवटा...
---
मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
१९ आँक्टोबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment