Er Rational musings #775
मन, मनगट व मेंदू या मानवाच्या सामर्थ्यवान त्रिकूटापैकी पहिले पुष्प म्हणजे मन.
मन वाभर सैर भैरं, क्षणात रुसणारं
मन बेधुंद उडणारं, क्षणात हसणारं
मन वाहे गगनात, मन मस्त आनंदीत
मन भावना रुजवीत, मन मोठ्ठ समजूत
मन काबूत शिंपीत, मन दावणीला जोडत
मन पंख पसरत, मन उंच उंच झोकत
मन मोहोर फुलत, मन बहर सजत
मन स्वप्नं गुंफत, मन जग जिंकत
मन सुंदर सुरेख काव्य कवी कल्पत
मन हे मीने परी स्वच्छंद अलगद तरंगत!
आणि, दिवास्वप्नं म्हणजे तर मनाचा अनोखा आविष्कार. कळत नकळत आपण दिवास्वप्नांतच वावरत असतो ना?
उगाचच नाही म्हणत, मनीं वसे जे स्वप्नीं दिसे...
---
मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
२६ आँक्टोबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment